नाशिक

7 लाख 72 हजार मतदारांचे स्व-गणना पत्रक बाकी

17 पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

नाशिक : प्रतिनिधी
मतदार यादीतील नोंदी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला वेग देण्यात आला आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील तब्बल 7 लाख 72 हजार 979 मतदारांनी अद्याप स्व-गणना पत्रक भरून मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांकडे (बीएलओ) जमा केलेले नाही. या मतदारांनी कोणताही विलंब न करता 17 ऑगस्ट 2026 पर्यंत स्व-गणना पत्रक भरून जमा करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले.
मतदार यादीतील प्रत्येक नोंद अचूक असणे आवश्यक असून, यासाठी मतदारांकडून स्व-गणना पत्रक भरून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पत्रकाच्या माध्यमातून मतदारांना मतदार यादीतील आपली नोंद तपासता येणार असून, आवश्यक माहिती प्रशासनाला उपलब्ध करून देता येणार आहे. त्यामुळे मतदारांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.
स्व-गणना पत्रक भरून ते मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍याकडे जमा करणे आणि त्यानंतर त्याचे संगणकीकरण करणे, या दोन्ही प्रक्रियांसाठी 17 ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई उपस्थित होत्या.

या नोंदींकडे विशेष लक्ष
मतदार यादीच्या पुनरीक्षणात खालील नोंदींची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन :
मयत मतदार : मृत व्यक्तीचे नाव मतदार यादीत असल्यास संबंधित बीएलओला माहिती द्यावी.
स्थलांतरित मतदार : कायमस्वरूपी स्थलांतर झालेल्या मतदारांची नोंद असल्यास ती प्रशासनाच्या निदर्शनास आणावी.
दुबार नोंद : एकाच मतदाराचे एकापेक्षा अधिक ठिकाणी नाव असल्यास त्याची माहिती द्यावी.
अडचण आल्यास : संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍याशी संपर्क साधावा.

दुबार नोंदींची माहिती द्या
मतदार यादी अधिक अचूक करण्यासाठी मयत व्यक्तींची नावे, स्थलांतरित मतदारांच्या नोंदी तसेच एकाच व्यक्तीच्या दुबार नोंदी शोधणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारच्या नोंदी आढळल्यास मतदारांनी त्याची माहिती संबंधित बीएलओकडे द्यावी. पडताळणीनंतर नियमानुसार अशा नोंदींबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. स्व-गणना पत्रकात मतदारांनी आपली आवश्यक माहिती अचूकपणे भरावी. ज्या मतदारांना पत्रक वितरित करण्यात आले आहे; परंतु त्यांनी ते अद्याप भरून बीएलओकडे जमा केलेले नाही, त्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी. अंतिम मुदतीनंतर पत्रक स्वीकारणे किंवा त्याचे संगणकीकरण करण्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी मतदारांनी शेवटच्या दिवसाची वाट पाहू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ऑनलाइन सुविधेचाही वापर करता येणार
मतदारांना उपलब्ध ऑनलाइन सुविधेचा वापर करूनही स्व-गणना पत्रकातील आवश्यक माहिती भरता येणार आहे. ऑनलाइन पत्रक भरताना काही अडचण आल्यास संबंधित बीएलओशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अंतिम मुदत : 17 ऑगस्ट 2026

स्व-गणना पत्रक कोणी भरावे?
मतदार यादीत नाव असलेल्या आणि स्व-गणना पत्रक वितरित झालेल्या मतदारांनी ते भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍याकडे जमा करावे.

काय करायचे?
मतदार यादीतील स्वतःची नोंद तपासावी.
आवश्यक माहिती अचूकपणे भरावी.
पत्रक बीएलओकडे जमा करावे.
ऑनलाइन सुविधा उपलब्ध असल्यास तिचाही वापर करावा.

Self-enumeration forms for 7.72 lakh voters are pending.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

14 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

14 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

14 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

14 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

14 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

15 hours ago