विजेचा शॉक लागून महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ जखमी

जुने नाशिक : वार्ताहर

गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील महावितरण कंपनीची उच्च दाबाची मुख्य वाहिनीची तपासणी सुरु असतांना विजेचा शॉक लागून महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ भीष्माचार्य जालिंदर काशीद (वय ५२, राहणार मखमलाबाद) हे महात्मा फुले मार्केटच्या स्लॅबवर पडून जबर जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.दरम्यान स्लॅबवरून खाली आणण्यासाठी सुमारे अर्धा तास त्यांना स्लॅबवर ताटकळत पडून रहावे लागले. त्यांच्या मदतीसाठी ॲम्बुलन्स सेवा देखील उपलब्ध झाली नाही म्हणून छोटा हत्ती या वाहनातून स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांची प्रकृती चांगली असून एका खाजगी इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यान त्यांना शॉक लागला किंवा त्यांचा बॅलन्स जाऊन ते कोसळले, याबद्दल पुरेशी माहिती मिळू शकली नाही. पण त्यांना शॉक लागल्याची माहिती बघ्यांनी दिली आहे. याबाबत महावितरण कंपनीचे इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर उद्या (दि.२) घटनास्थळाची पाहणी करून याची शहानिशा करणार असल्याची माहिती महावितरणचे भद्रकाली विभागाचे सहाय्यक अभियंता शशांक पेंढारकर यांनी दिली आहे. दरम्यान स्लॅबवरून खाली आणण्यासाठी अग्निशामक दलाचे जवानांना पाचरण करण्यात आले होते. त्यांनी लॅडर व स्ट्रेचरच्या मदतीने जखमी काशीद यांना खाली आणले. यावेळी स्ट्रेचरला खांद्यावर घेऊन खाली आणण्यासाठी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते गयास अन्सारी यांनी खास मेहनत घेतली. याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच काशीद यांचे नातेवाईकांनी देखील अन्सारी यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

‘पॅड’साठीही लढा

सरकारकडे मासिक पाळी स्वच्छतेसाठी धोरण आहे, योजना आहेत, कागदोपत्री आकडे आहेत. पण या धोरणाची अंमलबजावणी…

43 minutes ago

नेपाळचे बदलते राजकारण

नेपाळचे राजकारण गेल्या दोन दशकांपासून अस्थिरतेच्या भोवर्‍यात अडकलेले होते. राजेशाही संपल्यानंतर लोकशाहीची स्थापना झाली असली…

58 minutes ago

‘नारी’शक्तीच्या आडून मिशन निवडणूक

पश्चिम बंगाल, तामिळनाडूमधील मतदान तोंडावर आले असतानाच कोणताही संदर्भ नसताना केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात संसदेचे…

1 hour ago

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा गैरवापर की संधी?

आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे तंत्रज्ञान वेगाने सर्व क्षेत्रांमध्ये प्रवेश करत आहे. शिक्षण…

1 hour ago

कोठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?

रोजचं वर्तमानपत्र वाचलं, वृत्तवाहिन्या पाहिल्या तसेच समाजमाध्यमावर फेरफटका मारला तरी महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे निघालेले दिसतील.…

1 hour ago

मजा करणारे, कष्ट करणारे समजून घ्या

संपलेल्या दहा दिवसांत समाजातील दोन प्रकार मी जवळून बघितले. एक प्रकार म्हणजे कोकणातून मजुरीसाठी आलेले,…

1 hour ago