‘समृद्धी’वर अपघातात सात ठार

बोलेरोला ट्रकची धडक; 20 जण जखमी

अमरावती : प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील धामणगावजवळ समृद्धी महामार्गावर गुरुवारी पहाटे दुर्गामूर्ती घेऊन जाणार्‍या बोलेरो पिकअप व्हॅनला भरधाव ट्रकने धडक दिल्याने किमान सात जण ठार, तर 20 जण जखमी झाले. हा अपघात पहाटे साडेतीनच्या सुमारास अमरावती-धामणगाव रेल्वे मार्गाजवळ, चेनेज क्रमांक 97 जवळ घडला.
पीडित हे वर्धा जिल्ह्यातील सिंधी मेघे येथील अग्निहोत्री कॉलेजमागील सोमनाथ लेआउटमधील एका मंदिर गटाचे तरुण भक्त आणि सदस्य होते. नवरात्रापूर्वी मूर्ती घेऊन ते शेगावहून घरी परतत असताना हा अपघात झाला. पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.
मृतांमध्ये घनश्याम पाटील, प्रवीण बकाने, गोलू बादलग्वार, ओम गावडे, दाताजी खुर्सगे, रोशन राऊत आणि एका अज्ञात व्यक्तीचा समावेश आहे. जखमींना सुरुवातीला धामणगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर विशेष उपचारांसाठी त्यांना
वर्धा येथील सावंगी मेघे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, जखमींपैकी किमान पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (एसपी) निकेतन कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी सांगितले की, अपघाताचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही आणि त्याची सविस्तर चौकशी सुरू आहे.

Seven killed in accident on ‘Samriddhi’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *