स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी

नाशिक : प्रतिनिधी
स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता मोहिमेद्वारे पंचवटी येथील कन्नमवार पूल परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत स्वच्छतेचा संदेश दिला. यावेळी गोदावरी नदीपात्रालगत 7.280 टन कचरा संकलित करून खत प्रकल्पाकडे रवाना करण्यात आला. 20.595 टन राडारोड्याची विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेत महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप आदी सहभागी झाले होते.
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून नाशिक महापालिकेच्या वतीने पंचवटी विभागातील विविध परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. भाजप गटनेते श्याम बडोदे, महाजन यांचे स्वीय सहायक संदीप जाधव यांची उपस्थिती लाभली. मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्या आदेशानुसार आणि संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी प्रभाग क्रमांक 3 मधील नगरसेविका प्रियंका माने, नगरसेवक गौरव गोवर्धने, नगरसेविका जुई शिंदे, नगरसेवक सुरेशअण्णा पाटील, सुधाकर बडगुजर, धनंजय माने, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे व क्वालिटी कंट्रोलचे रोहित पवार यांच्या उपस्थितीत रामकुंड येथील गांधी ज्योत (स्मारकास) येथे अभिवादन करण्यात आले. यानंतर पंचवटी विभागातील गोदावरी नदीपात्रालगत कन्नमवार पूल, पंचवटी कॉलेजसमोरील सर्व्हिस रोड परिसर, तसेच लगतच्या परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवली.
या स्वच्छता मोहिमेदरम्यान परिसरातून 7.280 टन प्लास्टिक, कपडे व तत्सम कचरा संकलित केला. संकलित कचरा घंटागाडीद्वारे खत प्रकल्पावर रवाना केला. परिसरातील 20.595 टन राडारोडा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला. या विशेष स्वच्छता मोहिमेत मनोज साठे, राजेश पंडित, चंदू पाटील यांच्यासह पर्यावरणप्रेमी नागरिक, डॉ. मनीषा रौंदळ, सायकलिस्ट असोसिएशन तसेच विविध सामाजिक संस्थांनी
उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

स्वच्छता निरीक्षक कोर्सच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, नाशिक केंद्राचे जीवन सोनवणे (विभागीय संचालक) यांच्या सहभागाने स्वच्छता निरीक्षक कोर्सचे 200 विद्यार्थी, त्यांच्यासमवेत ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंटचे 30 स्वच्छता कर्मचारी, नाशिक महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक तसेच 18 सफाई कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. स्वच्छता ही सेवा हा संदेश जनमानसांत रुजविणे, नागरिकांत स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे, तसेच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे, या उद्देशाने ही विशेष स्वच्छता मोहीम राबवली.

Seven tonnes of waste collected during the ‘Swachhata Hi Seva’ campaign.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *