कीटकनाशक सेवन केल्याने सतरावर्षीय युवतीचा मृत्यू

सोग्रस : वार्ताहर
चांदवड तालुक्यातील पारेगाव शिवारात 17 वर्षीय युवतीने विषारी कीटकनाशक सेवन केल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. रत्नाबाई नामदेव गवळी (वय 17, रा. पारेगाव) या युवतीने तिच्या राहत्या घरी विषारी कीटकनाशक सेवन केले. यामुळे तिला मळमळ व उलट्यांचा त्रास होऊ लागला. ही घटना घरातील कुटुंबीयांना समजताच किसन गवळी यांनी तिला उपचारासाठी वणी (दिंडोरी) रुग्णालयात दाखल केले.
वणी रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारांसाठी वसंतराव मेडिकल कॉलेज, आडगाव, नाशिक येथे दाखल केले.
मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रॉबिन वर्गीस यांनी रत्नाबाई नामदेव गवळी हिला तपासून मृत घोषित केले. या घटनेसंदर्भात प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.शिरोळे यांनी पोलीस ठाण्यात ही माहिती दिली.
या घटनेसंदर्भात वडनेर भैरव (ता. चांदवड) पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाधव व सहकारी करीत आहेत.

Seventeen-year-old girl dies after consuming pesticide

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *