पिके करपली, पशुधनावरही चाराटंचाईचे सावट
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
यंदा त्र्यंबकेश्वर तालुक्यात कागदोपत्री सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असली तरी भात, नागली आणि वरईच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात पावसाने दडी मारल्याने तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सप्टेंबरपासूनच शिवारात भाताची व नागली-वरईची पिके करपून गेल्याने बळीराजा हतबल झाला असून, शासनाने जाहीर केलेली हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची भावना व्यक्त
होत आहे.
तालुक्यातील 26 हजार हेक्टर वहितीखालील क्षेत्रापैकी 16 हजार हेक्टरवर भाताची, तर उर्वरित क्षेत्रावर नागली, वरई आणि उडदाची लागवड झाली होती. शेतकर्यांनी उसनवारी करून बी-बियाणे, मशागत व मजुरीवर हेक्टरी सरासरी 50 हजार रुपये खर्च केले. मात्र, आवणीनंतर पाऊस गायब झाला आणि परतीचा पाऊसही न झाल्याने हाताशी आलेली पिके करपली. हेक्टरी 40 क्विंटल अपेक्षित असलेले भाताचे उत्पादन थेट शून्य ते 5 क्विंटलवर आले आहे. परिणामी, तालुक्यातील शेतकर्यांचा सुमारे 100 ते 120 कोटी रुपयांचा खर्च वाया गेला असून, दिवाळीही अंधारात गेली आहे. आगामी काळात अन्नधान्याचा तीव्र तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे.
पशुधनावर स्थलांतराचे सावट
पावसाअभावी गवत आणि भाताचे तणस कमी झाल्याने पशुधनाच्या चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्र्यंबकेश्वर, वेळुंजे, हरसूल, ठाणापाडा आणि डहाळेवाडी या पाच मंडळांत एकूण 69 हजार 787 पशुधन असून, त्यांना दररोज 312 मेट्रिक टन वैरणीची गरज भासते. सध्या उपलब्ध असलेला चारा केवळ तीन महिनेच पुरेल इतका आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2027 नंतर पुढील चार महिने चारा-पाण्यासाठी जनावरांसह स्थलांतर करण्याची वेळ पशुपालकांवर येणार आहे.
Severe drought conditions in Trimbakeshwar
वर्षभर 3 हजार रुपये दराची मागणी; निर्यातीसाठी स्थिर धोरण राबविणे गरजेचे लासलगाव : वार्ताहर कांदा…
भौगोलिक रचना पाहता तालुका पाण्याचे खोरे असल्याचे तज्ज्ञाचे मत निफाड : तालुका प्रतिनिधी दरवर्षी हिवाळ्यात…
वणी-सप्तशृंगगड घाटरस्त्यावर वाहनांची वर्दळ सप्तशृंगगड : प्रतिनिधी दिवाळीच्या सुट्ट्या संपून दैनंदिन कामकाजाला सुरुवात झाली असली,…
मनपाची यंत्रणा असतानाही बांधकाम विभागावर भरोसा नाशिक : प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेचा स्वतंत्र बांधकाम विभाग आणि…
ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरला धडक; ट्रकला लागली आग चांदवड (वार्ताहर) : मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाट…
एकाच वेळी दोन द्रव इंधन क्षेपणास्त्रे डागू शकणार्या नव्या ड्युअल मिसाइल लॉन्चरचे अनावरण तेहरान :…