नाशिक

सप्तशृंगगड भाविकांनी गजबजला

वणी-सप्तशृंगगड घाटरस्त्यावर वाहनांची वर्दळ

सप्तशृंगगड : प्रतिनिधी
दिवाळीच्या सुट्ट्या संपून दैनंदिन कामकाजाला सुरुवात झाली असली, तरी श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. सुट्ट्यांच्या हंगामानंतर गडावरील गर्दी ओसरते, असा आजवरचा अनुभव असला, तरी यंदा मात्र कामकाजाचे दिवस सुरू होऊनही मंदिर परिसरात भक्तांची मोठी मांदियाळी पाहायला
मिळते आहे.
गेल्या आठवड्यापासून उत्तर महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश व खान्देशातून हजारो भाविकांनी सप्तशृंगगडावर हजेरी लावली आहे. सध्या खासगी वाहने, ट्रॅव्हल्स आणि एसटी बसेसच्या माध्यमातून सहकुटुंब येणार्‍या भाविकांची संख्या मोठी आहे.
परिणामी, वणी ते सप्तशृंगगड घाटरस्त्यावर वाहनांची वर्दळ असून, वाहनतळ परिसरातही मोठी गर्दी दिसत आहे. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या असून, संबळाचा निनाद व आई सप्तशृंगीच्या नावाने उदो उदो अशा जयघोषाने संपूर्ण गड परिसर दुमदुमून गेला आहे.
नवसपूर्तीसाठी येणार्‍या भक्तांची संख्या यात लक्षणीय आहे. दरम्यान, भाविकांच्या या अखंड ओघामुळे गडावरील प्रसाद, खण-नारळाचे साहित्य, हॉटेल्स आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. सण-उत्सवापुरती मर्यादित न राहता बाराही महिने सुरू
असलेली ही गर्दी सप्तशृंगगडाच्या वाढत्या धार्मिक पर्यटनाची साक्ष देत आहे.

Saptashrungagad thronged with devotees

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

निफाड हिवाळ्यात का होते थंडा थंडा कूल कूल?

भौगोलिक रचना पाहता तालुका पाण्याचे खोरे असल्याचे तज्ज्ञाचे मत निफाड : तालुका प्रतिनिधी दरवर्षी हिवाळ्यात…

2 minutes ago

महापौरांच्या प्रभागातील 29 कामांसाठी बांधकाम विभागाला हवीय एनओसी

मनपाची यंत्रणा असतानाही बांधकाम विभागावर भरोसा नाशिक : प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेचा स्वतंत्र बांधकाम विभाग आणि…

26 minutes ago

राहुड घाटात दोन ट्रकच्या धडकेत तिघे जखमी

ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरला धडक; ट्रकला लागली आग चांदवड (वार्ताहर) : मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाट…

30 minutes ago

इराणने जगाला दिला धक्का; भूमिगत ‘मिसाइल सिटी’चे प्रदर्शन

एकाच वेळी दोन द्रव इंधन क्षेपणास्त्रे डागू शकणार्‍या नव्या ड्युअल मिसाइल लॉन्चरचे अनावरण तेहरान :…

1 hour ago

पन्नास कोटी लोक गरिबीतून बाहेर

पंतप्रधान मोदींचा गुजरातमधील भाजप मेळाव्यात दावा नवी दिल्ली : गेल्या बारा-तेरा वर्षांत भारतातील सुमारे 50…

1 hour ago

धुळ्याच्या नऊ भाविकांवर काळाचा घाला

खाटू श्यामजीच्या दर्शनावरून परतताना अपघात, मृत एकाच कुटुंबातील जयपूर/नवी दिल्ली : प्रतिनिधी देशासाठी 24 तासांचा…

2 hours ago