काय सांगता..? अल्लू अर्जुनने नाकारली चक्क करोडोंची ऑफर कारण…

अल्लू स्वतः तंबाखूचे सेवन करत नाही. त्यामुळे त्यांनी तंबाखू कंपनीची जाहिरात करण्यास नकार दिला. अल्लू चित्रपटांमध्ये सिगारेट ओढत असेल, पण प्रत्यक्षात तो धुम्रपान करत नाही. त्यांचा असा विश्वास आहे की ते स्वतः जे सेवन करत नाहीत, त्याचा प्रचार कशासाठी? सुपरस्टार अल्लू अर्जुनने पुष्पा चित्रपटातील मैं झुकेगा नहीं… हा प्रसिद्ध संवाद प्रत्यक्षात सिद्ध केला आहे. त्याने
नाकरलेल्या ऑफरमुळे जगभरात खळबळ उडवून दिली आहे. त्याला अलीकडेच एका मोठ्या तंबाखूच्या ब्रँडची जाहिरात ऑफर करण्यात आली होती. त्याला करोडो रुपये दिले जात होते. पण पुष्पाने ही ऑफर धुडकावून लावायला वेळ घेतला नाही. अल्लूच्या या निर्णयामुळे त्याचे सगळीकडून कौतुक होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनीने अल्लू अर्जुनला करोडो रुपयांची ऑफर दिली होती. परंतु अल्लूला जाहिरात पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी तंबाखूचे सेवन करण्यास सुरवात करावी असे वाटत नाही. अल्लू स्वतः तंबाखूचे सेवन करत नाही. त्यामुळे त्यांनी तंबाखू कंपनीची जाहिरात करण्यास नकार दिला. अल्लू चित्रपटांमध्ये सिगारेट ओढत असेल, पण प्रत्यक्षात तो धूम्रपान करत नाही. त्यांचा असा विश्वास आहे की ते स्वतः जे सेवन करत नाहीत, त्याचा प्रचार कशासाठी?

 

अक्षय होत आहे ट्रोल
अजय देवगण, शाहरुख खाननंतर अक्षय कुमार पान मसाल्याच्या जाहिरातीत दिसला आहे, ज्यासाठी त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. वास्तविक, अक्षयने त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते की, गुटखा कंपन्या त्याला करोडो रुपयांची ऑफर देतात, पण तो स्वीकारत नाही. ते म्हणाले, जे चुकीचे आहे ते चुकीचे आहे. आता अक्षयचा व्हिडिओ शेअर करून लोक म्हणत आहेत की तो स्वतःचा मुद्दा विसरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *