125 एकरवर होणार विस्तार; दुष्काळी भागाचा चेहरामोहरा बदलणार
सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्यातील शहा गावात राज्याचे लक्ष वेधून घेणारे राष्ट्र निर्माण ट्रस्टचे आयुर्वेद, सुरक्षा आणि सांस्कृतिक अभ्यास केंद्र साकारणार आहे. एकाच ठिकाणी 125 एकर परिसरात विस्तारलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे केवळ सिन्नरच नव्हे, तर राज्याच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वैभवात भर पडणार आहे. राष्ट्र निर्माण ट्रस्टचे किर्तांगळीचे भूमिपुत्र सुरेश चव्हाणके यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे.
मुंबईतील मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पासाठी आवश्यक असलेली गायरान जमीन उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष विठ्ठल जपे आणि शहाचे सरपंच संभाजी जाधव उपस्थित होते.
शहा येथील या प्रकल्पासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
ग्रामपंचायतीने गायरान जमीन देण्याची तयारी दर्शवली असून, या केंद्रामुळे राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एक नवीन मानाचा तुरा खोवला जाईल, असे प्रकल्पाबाबत बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. मंत्री बावनकुळे यांनी फेसबुक पेजच्या माध्यमातून या प्रकल्पाबाबत माहिती दिली.
125 एकरवर पसरलेल्या या प्रकल्पामुळे सिन्नरच्या पूर्व भागातील तरुणांचे शहरांकडे होणारे स्थलांतर थांबण्यास मदत होईल. तसेच, आयुर्वेद आणि सुरक्षा या दोन भिन्न पण महत्त्वाच्या विषयांचे एकत्र शिक्षण देणारे हे राज्यातील अशा प्रकारचे पहिलेच मोठे केंद्र ठरेल.
प्रकल्पाची त्रिसूत्री वैशिष्ट्ये:
सैनिक प्रशिक्षण : देशाच्या संरक्षणासाठी सज्ज होणार्या तरुणांना येथे जागतिक दर्जाचे लष्करी प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना फौजेत जाण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळेल.
आयुर्वेद संग्रहालय : भारतीय प्राचीन संस्कृती आणि आयुर्वेदाचा वारसा जतन करण्यासाठी येथे एक भव्य आणि अत्याधुनिक संग्रहालय उभारण्यात येईल.
रोजगार निर्मिती : या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास होऊन रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.
दुष्काळी भागाला संजीवनी
सिन्नरचा पूर्व भाग कायमच पावसाअभावी संकटात असतो. शेतीवर मर्यादा असल्याने तरुणांना रोजगारासाठी शहरांकडे धाव घ्यावी लागते. मात्र, सुरेश चव्हाणके यांच्या मार्गदर्शनाखाली होणारा हा प्रकल्प या भागासाठी आर्थिक आणि सामाजिक संजीवनी ठरणार आहे.
-संभाजी जाधव, सरपंच, शहा
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…