Categories: नाशिक

टँकरद्वारे 95 गाववाड्यांना पाण्याचे नियोजन

मालेगाव पंचायत समितीतर्फे पाणीटंचाई कृती आराखडा तयार

मालेगाव : प्रतिनिधी
गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करण्याची वेळही आली आहे. गेल्या वर्षभरापूर्वी समाधानकारक पाऊस झाला असला तरी अपेक्षित प्रमाणात भूजल साठा वाढलेला नसल्याने यंदाही पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मालेगाव तालुक्यातील 95 गाववाड्यांना पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे.

दरवर्षी उद्भवणार्‍या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रशासन सतर्क झाले असून, पंचायत समितीतर्फे पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. भूजल पातळी सातत्याने घटू लागल्याने काही भागांत आतापासूनच टंचाईची झळ जाणवू लागली असून, जानेवारी ते जून या कालावधीत टप्प्याटप्प्याने तब्बल 95 गाववाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज भासणार असल्याचे या आराखड्यात नमूद केले आहे. विहिरींची पातळी कमी होणे आणि भूजलावर वाढलेला ताण लक्षात घेता परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असून, त्यावर उपाययोजनांची आखणी करण्यात आली आहे.
पाणीटंचाई कृती आराखड्याची तीन टप्प्यांत विभागणी केली असून, दुसर्‍या टप्प्यात 36 ठिकाणी टँकरद्वारे, तर तीन ठिकाणी खासगी विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. तिसर्‍या टप्प्यात 37 खासगी विहिरी अधिग्रहित करणे, 53 ठिकाणी विंधन विहिरी घेणे तसेच 11 गावांतील नळपाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचा समावेश आहे.आराखड्यात तात्पुरत्या नळपाणीपुरवठा योजना, विहिरींचे खोलीकरण व गाळ काढणे, विंधन विहिरी घेणे, खासगी विहिरी अधिग्रहण, बुडकी बसविणे, विशेष दुरुस्ती तसेच टँकर व बैलगाडीच्या सहाय्याने पाणीपुरवठा अशा विविध उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात टँकर हाच प्रमुख आधार ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यंदा पावसाचे प्रमाण तुलनेने चांगले असल्याने मागील वर्षाच्या तुलनेत टंचाईची तीव्रता काहीशी कमी राहील, असा अंदाज प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे.

संभाव्य टंचाईग्रस्त गावे

मालेगाव तालुक्यातील अजंग, काष्टी, टेहरे, वडगाव, बेळगाव, चिखलओहोळ, पांढरूण, पळासदरे, मुंगसे, मालनगाव, मळगाव, राजमाने, रोझे, शेंदुर्णी, शेरूळ, चंदनपुरी, येसगाव, डाबली, देवघट, देवारपाडे, दसाने, दापुरे, दाभाडी, लोणवाडी, लखानी, निमगुले, निमगाव खुर्द, गिलाने, सिताने, नाळे, भारदेनगर, हाताणे, सवंदगाव, साजवाळ, कळवाडी, जळकू, वळवाडी, सौंदाणे, झोडगे, टोकडे, कुकाणे, गुगुळवाड, निमशेवडी आदी गावांचा संभाव्य टंचाईग्रस्त यादीत समावेश असून, या गावांना टंचाईतून बाहेर काढण्यासाठी तात्पुरत्या तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

Water supply to 95 villages through tankers

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 days ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 days ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 days ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 days ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 days ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 days ago