नाशिक

नाशिकरोड रेल्वेस्थानकात महिलांसाठी ‘शांती आलय’

एअरपोर्ट शैलीतील आसनव्यवस्था; प्रतीक्षालयाला नवे रूप

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
भुसावळ विभाग, मध्य रेल्वे यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक एकवर महिलांसाठी सुसज्ज व सुरक्षित प्रतीक्षालय ‘शांती आलय’ सुविधा सुरू केली आहे. महिलांच्या सन्मान, सुरक्षितता व आरामाला प्राधान्य देत हा उपक्रम नॉन-फेअर रेव्हेन्यू योजनेंतर्गत राबविण्यात आला आहे.
‘शांती आलय’ हे केवळ प्रतीक्षालय नसून, महिलांच्या सन्मान, सुरक्षितता व गरजांच्या पूर्ततेसाठी एक सकारात्मक पाऊल आहे. ही संकल्पना भविष्यात भुसावळ विभागातील इतर प्रमुख स्थानकांवरही राबवली जाणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
या उपक्रमात जुन्या प्रतीक्षालयाचे रूपांतर करून ‘शांती आलय’ तयार करण्यात आले आहे, जे फक्त महिलांसाठी राखीव असून, आकर्षक गुलाबी रंगसंगती, स्वच्छता व आधुनिक सुविधा यांचा उत्तम संगम आहे.
‘वूलू लाउंज’ला रेल्वेचा पर्याय :
पूर्वी वूलू पावडर रूम लाउंज या खासगी भागीदारी प्रस्तावाच्या माध्यमातून ही संकल्पना राबविण्याचा विचार होता. मात्र, चर्चा अपूर्ण राहिल्यामुळे भुसावळ विभागाने स्वतः पुढाकार घेऊन शांती आलय साकारले. ही सुविधा म्हणजे भारतीय रेल्वेने महिलांसाठी तयार केलेली आधुनिक, सुरक्षित आणि सुसज्ज प्रतीक्षागृहाची नवीन व्याख्या आहे.

स्वावलंबी व प्रवासीकेंद्रित सेवा सुधारणा

नॉन-फेअर रेव्हेन्यू उपक्रमांच्या माध्यमातून प्रवाशांच्या सुविधांचा विकास आणि उत्पन्न निर्मितीचा योग्य समन्वय साधत भुसावळ विभागाने रेल्वेसेवेत एक नवा आदर्श घालून दिला आहे.

मल्टिपर्पज स्टॉल :
चहा/कॉफी व रेल नीर पाण्याच्या बाटल्यांसाठी स्वयंसेवी मशिन्स
प्रवाशांसाठी सहाय्य करणारा ट्रॅव्हल डेस्क
मासिके, वर्तमानपत्रे, सॅनिटरी नॅपकिन्स, टॉयलेटरी आणि otc औषधे विक्री.
ही व्यापारी जागा एकूण प्रतीक्षालयाच्या केवळ 10 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे.
परवडणारे शुल्क :
प्रौढ महिला : 20 रुपये पहिला तास. नंतर प्रत्येक तासासाठी 15 रुपये जादा.
मुली – 5 ते 12 वयोगट- दहा रुपये पहिला तास. नंतर प्रति तासासाठी 8 रुपये जादा.

प्रमुख वैशिष्ट्ये व सुविधा :
क्षेत्रफळ : 86.08 चौ. मी. प्रवेश : केवळ महिला प्रवाशांसाठीच
आरामदायक आसनव्यवस्था : एअरपोर्ट शैलीतील स्टेनलेस स्टील गाद्यांसह बसण्यासाठी आसने, मूळ क्षमतेला यथावत ठेवून सुयोग्य मांडणी.
नूतनीकरण केलेली अंतर्गत सजावट : उन्नत लायटिंग, अतिरिक्त फॅन्स व वातानुकूलन यंत्रणेसह आरामदायक व शांत वातावरण.
स्वतंत्र शौचालय सुविधा : अत्याधुनिक, स्वच्छ व नियमित देखभाल असलेले स्वच्छतागृह.
प्रवासी सुलभ सुविधा : एलईडी दिवे व पंख्यांद्वारे उजळ व हवेशीर वातावरण.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 hour ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 hour ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 hours ago