नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
संततधारेमुळे नाशिकरोड व परिसरात जनजीवन विस्कळीत झाले होते. पाच ते सहा ठिकाणी वृक्ष पडल्याने त्या भागातील वाहतूक काही काळ बंद होती. या पावसामुळे दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. पाऊस सुरूच असल्याने चेहेडी येथील दारणा नदी व देवळालीगाव येथील वालदेवी नदीच्या पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ झाली.
बुधवारी रात्रीपासून नाशिकरोड व परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग झाली. परिसरातील देवळालीगाव विहितगाव, सिन्नर फाटा, शिंदे, पळसे, चेहेडी, एकलहरे, जेलरोड, दसक, पंचक, नेहरूनगर, उपनगर, गांधीनगर आदी भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
त्याचप्रमाणे दिवसभर विजेचा लपंडाव सुरूच असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. या पावसामुळे नागरिकांनी बाहेर न पडता घरी राहणेच पसंत केले तर अनेक व्यापार्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. पावसामुळे काही भागात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. दरम्यान, या पावसामुळे परिसरातील पाच ते सहा ठिकाणी वृक्ष पडले होते. त्यामुळे त्या भागातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. जेलरोड परिसरातील शर्मा स्टील सेंटरसमोर असलेल्या श्रीराम स्वीट येथे डिजिटल बोर्ड पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
त्याचप्रमाणे बिटको चौकात असलेल्या महावितरण कार्यालयाजवळील तिरुपती बिल्डिंग येथे वृक्ष पडल्याने त्या भागात असलेल्या कॉलनीतील वाहतूक विस्कळीत झाली होती तर सुभाष रोड येथील मटण मार्केटजवळ असलेल्या बर्मा शेलवाडी येथेसुद्धा वृक्ष पडल्याने वाहतूक बंद पडली होती. शुक्रवारी परिसरात असलेल्या निवृत्ती चाफळकर यांच्या निवासस्थानासमोरील वृक्ष पडले होते. त्यामुळे या भागातसुद्धा या रस्त्यावरील वाहतूक बंद पडली होती. या सर्व ठिकाणी अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पडलेले वृक्ष बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, दुपारी चार वाजेनंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली, मात्र तरीही परिसरात ठिकठिकाणी रिमझिम सुरू होती.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…