शरद पवार – उद्धव ठाकरे यांच्यात दोन तास खलबते
मुंबई : राज्यातील सुरू असलेल्या पेचप्रसंगावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये बैठक झाली . या बैठकीत शिवसेनेने आता रस्त्यावरची लढाई सुरू करावी , यावर एकमत झाल्याचं समजतंय . तसेच १६ आमदारांवर कारवाई सुरू करण्यात यावी , असंही ठरल्याचं समोर येत आहे . या बैठकीमध्ये अजित पवार , जयंत पाटील , अनिल देसाई , संजय राऊत उपस्थित असल्याची माहिती आहे . या बैठकीनंतर आता उद्धव ठाकरे शिवसेनेच्या खासदारांसोबत बैठक घेणार आहेत . एकनाथ शिंदेंच्या सोबत असलेल्या बंडखोर आमदारांवर दबाव निर्माण करण्यासाठी शिवसेनेने आता रस्त्यावर उतरावं , रस्त्यावरची लढाई सुरू करावी , असं या बैठकीत ठरल्याचं समजतंय . तसेच यामध्ये जास्तीत जास्त वेळकाढूपणा करावा , जेणेकरून शिंदे गटातील आमदारांवर अतिरिक्त दबाव तयार होईल , असंही ठरलं आहे .