शरद पवार यांच्या विरोधात ट्वीट करणाऱ्या युवकास अटक

आम्ही बागलाणकर ग्रुप चा सदस्य

सटाणा प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या सटाणा येथील निखिल भामरे यास दिंडोरी पोलिसांनी अटक केली, आम्ही बागलाणकर या ग्रुप च्या माध्यमातून आक्षेपार्ह ट्वीट केले होते, यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती, राष्ट्रवादी ने यावरून माफी न मागितल्यास भाजप विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता

राज्याच्या राजकारणात सध्या एकामागोमाग एक खळबळ करणारी प्रकरण घडत आहेत . राज ठाकरेंना धमकी आल्याचं आणि त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचं प्रकरण ताजं असताना आता मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट केली होती . जी सध्या सोशल मीडियासहीत सगळीकडे व्हायरल होत आहे .
बागलाण तालुक्यातील पिंगळवाडे येथील युवकाने ट्विटरवर ही पोस्ट केली आहे . सध्या संबंधित निखिल भामरे नावाचा हा युवक नाशिक येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली होती. या पोस्टमध्ये चक्क शरद पवारांना उद्देशून धमकीवजा इशाराच देण्यात आलाय . त्यामुळेच जितेंद्र आव्हाडांनी याला शोधून याच्यावर कारवाई करा अशी मागणी केली होती . ” वेळ आली आहे बारामतीच्या ” गाधी ” साठी … बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची …. # बाराचा काका – माफी माग * अशा आशयाच्या या पोस्टने सध्या खळबळ उडवून दिली आहे .

नाशिक ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता ट्विटरवर ही पोस्ट करणाऱ्या बागलाण तालुक्यातील युवकाला काही तासातच नाशिक येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले,

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *