ती एक स्त्री

आरंभ तू भक्तीशक्ती आणि एकनिष्ठतेचे स्वरूप तू. दुर्गा, लक्ष्मी अन् सरस्वतीचे गुण तुझ्यात अंशरूप अशी तू. सगळीकडे सगळ्या क्षेत्रात स्थापिले उत्तम उदाहरण देण्यास पात्र तू, तुझ्याकडे जीवनिर्मिती करण्याचा वरदानाचा ठेवा, ममता अन् माया. देवालाही वाटले तुझ्या उदरी अवतार घ्यावा. स्वराज्य अन् स्वातंत्र्याच्या लढाईत तुझा मोलाचा वाटा. भरभरून तुझ्या अंतःकरणी धैर्य अन् मनोबलाचा साठा. इवल्याश्या पावलाने ती मुलगी म्हणून जन्मास आली. बोबडे बोल बोलता बोलता शहाणपणाच्या गोष्टी शिकवणारी आजी झाली. बहीण होऊन ती ताई झाली. भावंडांना निरपेक्ष माया लावी. सात्वन करून ती सखी झाली. सुखदुःखाच्या गोष्टी वाटू लागली. आईमध्ये ती मैत्रीण शोधू लागली.
थोडेफार तिला समजू लागली. जीवनाच्या प्रवासात ती त्याची सहचारिणी झाली. त्याचे सुखदुःख ती आपले मानू लागली. बघताबघता ती त्याग अन् सर्मपणाची मूर्तिमंत उदाहरण झाली. स्वतःला ती विसरून गेली. साधारण असो किंवा असाधारण असो, स्त्री दिसत नाही कधी ती टेन्शन-फ्री. बर्‍याचदा होते तिला मूड स्विंग, कोणीच जुळवत नाही तिच्याशी ट्युनिंग. कामाचा असतो भरपूर व्याप, पण करत नाही कधी मनस्ताप.
व्यायाम करावा यासाठी करते संघर्ष अन् आटापिटा. सगळ्या जबाबदार्‍यांमध्ये डाइट प्लॅन राहतो बाजूला. शरीराने नसली तरी ती अंतर्मनातून असते फीट. घाबरत नाही परिस्थितीला ती भलतीच धीट. बहाल असतात तिला घरातील मंत्रिमंडळाची सगळीच पदे.
प्रत्येक ठिकाणी सर्वांचे तिच्यावाचून अडे. हिशोबाला क्लिअर ती संभाळे घरातील खर्च अपटुडेट. तिच्या व्यवस्थापनेपुढे वित्तमंत्र्याचे फेल बजेट. स्वच्छता अन् टापटीपपणा जपत तिने घराला दिले घरपण. व्रतवैकल्यासोबत साजरे केले तिने सण. चूल अन् मूल सांभाळता ती वेळप्रसंगी कामाला जाई.
मोठ्या उच्च पदावर किंवा असो, ती मोलकरीणबाई. परिस्थितीतून काढत नाही ती कधी पळवाटा. हतबल पुरुष कुठलाही असो. शेतकरी तो करतो आत्महत्या. कधी ऐकले आहे का कोणी शेतकर्‍याच्या बायकोने केली आहे का आत्महत्या.
अंत नाही तिच्या श्रम -कष्टांना नाही. कुठली रिटायरमेंट. आयुष्य जाते सरून तिचे करता करता सगळीकडे अ‍ॅडजेस्टमेंट. स्वयंपाकघरात तिचीच सत्ता, पण तिलाही वाटत असेल की, त्यानेही कामांना द्यावा हातभार थोडा. रविवारची सुट्टी असते सगळ्यांना.
सुट्टी कधीच येत नाही तिच्या वाटेला. तिच्यामुळे येतात सगळे नावारूपाला. सलाम स्त्रीच्या कर्तृत्वाला… हवे तरी काय तिला… आधार सहानुभूती आणि वात्सल्याचा जाणीव ठेवावी, प्रेम करावे, आदर द्यावा थोडा. दोघांनीही बरोबरीने चालवावा संसाराचा गाडा. कौतुक करावे थोडेफार. पुरवावेत वरचेवर लाड, देवाचे आभार मानून म्हणावे थँक्यू गॉड!

She is a woman

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *