काय करतोयस श्वास….उच्छवास.
हे काय रे …. हे उत्तरेका..
खरं सांगितलं तर.. असंय मग तुझं..
ते तर सगळेच करतात..
स्पेशल काय करतोस.
इतका वेळ श्वास घेत होतो.. आता नुसतेच उच्छवास सोडतोय..लांब लांब..
ए.. गप रे..काय झालंय सांग
नाहीतर काय करू यार … एक तर इतके दिवस गायब होतीस. आणि आता आलीयेस तर आज हमारा मूड नही हैं.. प्रेमाला काय मूड लागतो का यार…
हो न रे…
काय हो न रे..तुला न यार जाणीवच नाहीये.. असं नाहीये रे…
बरं… एक सांगू.. करवटे बदलते रहे सारी रात हम.. आपकी कसम..
खरंच..
हो ना.. तुझी शप्पथ..
ए..
बोल नं….. त्यातली एक ओळ आठवते.. हो नं.. त्याचा घोगरा आवाज..
तुम चले जावो,
नही तो कुछ नं कुछ हो जायेगा..
बोल नं..
त्याचीच भीती वाटते रे..
नाही करणार काही.. तू ये पण..
तुझी र्सीरीरपींळ आहे रे पण माझी नाही नं..
आँ….
हो नं..
इतका गोड दिसतोयस त्या डार्क टी-शर्टमध्ये.. वाटतं की धावत येऊन… गच्च…
बापरे.. थांब.. चिलखत घालून येतो..
ए.. जा. रे… म्हणून म्हणते… नको घालत जाऊस तो शर्ट.. आता तर अजून जोरात उच्छवास…… ती हळूच..
येतीये उद्या.. त्याच वेळी… आणि तोच शर्ट घालायला विसरू नकोस…
आणि त्याची अत्यानंदाने मारलेली शीळ आसमंतात घुमली….. आणि दोघांचाही प्रेम दिवस मस्त साजरा झाला…..

Sheel

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago