शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा गायब
फोन नॉट रीचेबल, कुटुंबीय चिंतेत
पालघर: उमेदवारी न मिळाल्याने पत्रकार परिषदेतच ढसाढसा रडत आत्महत्येचा विचार मनात येत असल्याचे सांगणारे शिंदे गटाचे पालघर येथील आमदार श्रीनिवास वनगा ये मागील बारा तासापासून बेपत्ता झाले आहेत. त्यांचा फोनही लागत नसल्याने कुटुंबीय चिंतेत सापडले आहेत, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांना शिवसेना (शिंदे) पक्षातर्फे उमेदवारी डावलल्याने वनगा कालपासून नैराश्यामध्ये असून ते आत्महत्या करण्याच्या विचाराधीन आहेत. प्रामाणिकपणाचे हेच फलित आहे का असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली फसवणूक केल्याचे आरोप केले होते.
पालघर विधानसभेसाठी श्रीनिवास वनगा यांच्या ऐवजी माजी खासदार राजेंद्र गावित यांना संधी देण्यात आली आहे. श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारताना निवडून येण्याची क्षमता नसल्याचे तसेच सर्वेक्षणात नकारात्मक निकाल मिळाल्याचे त्यांना पक्षाच्या वरिष्ठ मंडळींकडून सांगण्यात आले होते. अशावेळी भाजपामधून शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश देऊन राजेंद्र गावीत यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे वनगा यांनी शिंदे यांच्यावर आपल्याला फसवल्याचे आरोप करत ठाकरे हे माझ्यासाठी देव आहेत, मला त्यांची माफी मागायची आहे, असे म्हणत ढसाढसा रडले होते. मात्र त्यानंतर ते गायब झाले असून त्यांचा फोनही लागत नसल्याने त्यांचा शोध घेतला जात आहे.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…