मनमाडला भीषण अपघातात दोन लहान मुलांसह तीन जण ठार

मनमाड: आमिन शेख
– मनमाड नांदगावं महामार्गांवर पानेवाडी जवळ दोन  दुचाकीला टॅंकरने  दिलेल्या धडकेत दोन लहान मुलासह तीन जण ठार तर एक लहान मुलगा व  दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे त्यांना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल  करण्यात आले असुन गंभीर जखमींना मालेगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. मयत झालेले जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
         याबाबत अधिक माहिती अशी की मनमाड नांदगाव महामार्गावर दोन मोटारसायकला टॅंकर क्रमांक एम एच 16 सी सी 5524 ने धडक दिली या अपघातात दोन लहान मुलांसह तीन जणांचा मृत्यू झाला तर एक लहान मुलगा व दोन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तर गंभीर जखमींना मालेगाव येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.अपघाताची भीषणता इतकी होती की दोन्ही मोटारसायकलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व मनमाड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले पुढील तपास पोलीस करत आहेत.
भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

11 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

11 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

12 hours ago