शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा गायब , फोन नॉट रीचेबल, कुटुंबीय चिंतेत

शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा गायब

फोन नॉट रीचेबल, कुटुंबीय चिंतेत

पालघर: उमेदवारी न मिळाल्याने पत्रकार परिषदेतच ढसाढसा रडत आत्महत्येचा विचार मनात येत असल्याचे सांगणारे शिंदे गटाचे पालघर येथील आमदार श्रीनिवास वनगा ये मागील बारा तासापासून बेपत्ता झाले आहेत. त्यांचा फोनही लागत नसल्याने कुटुंबीय चिंतेत सापडले आहेत, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांना शिवसेना (शिंदे) पक्षातर्फे उमेदवारी डावलल्याने वनगा कालपासून नैराश्यामध्ये असून ते आत्महत्या करण्याच्या विचाराधीन आहेत. प्रामाणिकपणाचे हेच फलित आहे का असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली फसवणूक केल्याचे आरोप  केले होते.

पालघर विधानसभेसाठी श्रीनिवास वनगा यांच्या ऐवजी माजी खासदार राजेंद्र गावित यांना संधी देण्यात आली आहे. श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारताना निवडून येण्याची क्षमता नसल्याचे तसेच सर्वेक्षणात नकारात्मक निकाल मिळाल्याचे त्यांना पक्षाच्या वरिष्ठ मंडळींकडून सांगण्यात आले होते. अशावेळी भाजपामधून शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश देऊन राजेंद्र  गावीत यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे वनगा यांनी शिंदे यांच्यावर आपल्याला फसवल्याचे आरोप करत ठाकरे हे माझ्यासाठी देव आहेत, मला त्यांची माफी मागायची आहे, असे म्हणत ढसाढसा रडले होते. मात्र त्यानंतर ते गायब झाले असून त्यांचा फोनही लागत नसल्याने त्यांचा शोध घेतला जात आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

10 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

10 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

11 hours ago