गोकुळ गितेंसाठी शिंदेंचे खास विमान

मंत्री सामंतांसमवेत मुंबईला रवाना

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवत नाही तोच काही तासांत गोकुळ गिते यांना थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावणे धाडले. गिते यांना स्वत: मंत्री उदय सामंत घेण्यासाठी आले असता, ते ओझर विमानतळावरून मुंबईला रवाना झाले. त्यांच्यासमवेत आ. किशोर पाटील होते. गिते यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. याद्वारे शिंदेसेनेच्या हातातून गेलेली नाशिक जागा पुन्हा ताब्यात घेण्याची रणनीती आहे. गोकुळ गिते यांनी नाशिकच्या गडात ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. या धक्कादायक पराभवामुळे महायुतीला मोठा झटका बसला. गितेंनी विजय मिळवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता गोकुळ गिते यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. विधान परिषदेतील निकालानंतर गोकुळ गिते यांना एकनाथ शिंदेंची भेट घ्यायला बोलावण्यात आले आहे. ते मुंबईत जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांचा पक्षप्रवेश शिवसेने होईल आणि महायुतीमधून ते विजयी उमेदवार म्हणून जाहीर केले जाईल. त्यामुळे अपक्ष निवडून आलेले गोकुळ गिते हेही महायुतीचे आमदार असतील. मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन होता. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी जात आहे. राजकीय भूमिका काय, ते लवकरच सांगेन, असे ते म्हणाले.

Shinde’s special plane for Gokul Gite

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *