लाईफस्टाइल

शाही थाटात चमका- लेहंग्यांचे ग्लॅमरस अवतार

लग्नसराई म्हटलं की, डोळ्यासमोर येते ती गाणी, डान्स, डेकोरेशन आणि अगदी हो! तुमचा लूक! त्या खास दिवशी सगळ्यांच्या नजरा तुमच्यावर खिळलेल्या असतील, हे तुम्हालाच माहीत असतं. मग ते काकूंचं हिचा ड्रेस कुठून घेतला गं? असो की फ्रेंड्सचं क्वीन वाइब्स यार! तुम्हाला तुमचा लूक हटके आणि डॅशिंग हवाच असतो आणि अशा वेळी लेहंगा हा तुमच्या स्टाइलचा हिरो बनतो. तर चला, आज पाहूया लेहंग्यांचे असे काही ट्रेंड्स, जे केवळ नेहमीपेक्षा वेगळेच नाही, तर तुमचा वाओ! लूकसुद्धा नक्की करताहेत.

कढाईदार शाही लेहंगा; जसा राजकन्येला शोभे!
हा लेहंगा म्हणजे डिटेलिंगची पराकाष्ठा! भरजरी झरी, कलात्मक सुतकाम आणि पारंपरिक फुलोर्‍यांचं नक्षीकाम – असा लेहंगा घातला की, तुम्ही एखाद्या शिीळेव वीरार मधल्या राजकन्येसारख्या भासाल.

स्टाइल टिप्स
हेवी कुंदन नेकलेस आणि मांगटिका लूकला फिनिशिंग देतात.
गजरा आणि स्लीक हेअरबन केल्यास शाही टच वाढतो.
फ्लोरल प्रिंट लेहंगा, सौम्य रंगात उठावदार स्टाइल
हलकीफुलकी फ्लोरल प्रिंट्स आणि पेस्टल शेड्स हा लेहंगा म्हणजे सॉबर, पण स्पॉटलाइट ऑन मी लूकसाठी परफेक्ट. ब्रंच फंक्शन किंवा सकाळच्या कार्यक्रमांसाठी हाच बेस्ट!

स्टाइल टिप्स
मिनिमल मेकअप आणि मॅचिंग ब्रेसलेट्स लूकला फ्रेश ठेवतात.
सॉफ्ट कलर्समधले मोकळे केस- एकदम क्लासी.
अट्रॅक्टिव्ह ड्रेप लेहंगा, पल्लूची नवी क्रांती
पारंपरिक लेहंगा घालायचा, पण काहीतरी स्टाइलिश करायचंय? मग पल्लूला बेल्टने डिझायनर स्टाइलने ड्रेप करा. अगदी एखाद्या अभिनेत्रीप्रमाणे!

स्टाइल टिप्स
स्लीव्हलेस एम्ब्रॉयडरी ब्लाउज पेअर करा.
हाइलाइटर आणि कट-क्रीज आयशॅडो = इन्स्टा-रेडी!
ट्रेंडिंग डीप नेक रेड लेहंगा- अग्निपथाचा फॅशन मार्ग!
सहेलीच्या लग्नात  बनायचंय? मग हे लाल सौंदर्य ट्राय करा. डीप नेक ब्लाउज आणि भरदार लेहंगा- हा लूक एकाच वेळी बोल्ड आणि ग्रेसफुल आहे.

स्टाइल टिप्स
स्टेटमेंट झुमके आणि स्मोकी आयज लूकला उठाव देतात.
केस मोकळे ठेवून कॅप्शन द्या- ठशव पर्शींशी श्रेेज्ञशव ींहळी हेीं!
सिंपल, पण शिमरी लेहंगा- सौंदर्य, जे डोळ्यांत भरतं व्हाइट आणि ग्रेच्या शेड्समध्ये शिमर असलेला हा लेहंगा, दिसायला जरी साधा वाटला तरी त्याचा ग्लोच काही औरच असतो. दीप्ती आणि सौम्यता यांचा परिपूर्ण मिलाफ.

Gavkari Admin

Recent Posts

वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

  वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…

6 hours ago

मृत्यू पश्चातही आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच

मृत्यू नंतरही  आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…

6 hours ago

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे आज अधिवेशन

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…

7 hours ago

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

9 hours ago

शहरात दिवसभरात 14.2 मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…

9 hours ago

फायदेशीर करार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…

10 hours ago