नाशिक

सिन्नरमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण; शिवकार्याचे विचार प्रेरणादायी : उगले

सिन्नर : प्रतिनिधी
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिन्नर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले व उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
यानंतर उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान एकलव्य व महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यांनाही अभिवादन केले. याप्रसंगी गटनेते सागर भाटजिरे, गटनेते मनोज देशमुख, नगरसेवक उदय गोळेसर, बाळासाहेब उगले, सुनील गवळ, आशिष गोळेसर, पंकज जाधव, पंकज मोरे, सुदर्शन नाईक, सागर कोथमिरे, अमोल झगडे, विलास जाधव, अशोक जाधव, वरंदळ, नगरसेविका गीता वरंदळ, ज्योती मोरे, संध्या कासार, निशा बोडके, शोभा जाधव, मनीषा गवळी, कांताबाई जाधव, सुवर्णा उबाळे, सविता कानडी, अंबिका धनगर, ललिता हांडे, कमळाबाई पगार, आशा करपे, सविता खोळंबे, लक्ष्मी पवार यांच्यासह योगानंद गवळी, दत्ता हांडे, राजेंद्र जाधव, लोकेश धनगर, ज्ञानेश्वर उबाळे, उपमुख्याधिकारी दीपक बंगाळ, कर अधिकारी योगेश मुळे, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, आरोग्य निरीक्षक रवींद्र देशमुख, अभितोष सांगळे, ज्योती सोनवणे, विद्या सोनवणे, सुदर्शन लोखंडे, दीपक भाटजिरे, कैलास शिंगोटे, निवृत्ती चव्हाण, बाळू भोळे, संजय मुरकुटे यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवरायांचे कार्य, विचारांतून प्रेरणा घ्यावी

शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून सुशासन प्रस्थापित केले. शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेत त्यांनी लोकाभिमुख राज्यकारभार केला. 300 हून अधिक किल्ले जिंकून सागरी शक्ती उभी करत भारतीय आरमाराचा पाया त्यांनी घातला. स्त्रियांचा सन्मान, सर्वधर्मसमभाव आणि जनकल्याण ही मूल्ये त्यांच्या राज्यकारभाराची ओळख होती. त्यांच्या कार्य-विचारांतून प्रेरणा घेणे हीच खरी जयंती साजरी करण्याची भावना असल्याचे नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांनी नमूद केले.

Shiv Jayanti celebrated with enthusiasm in Sinnar

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या

कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या शहापूर: प्रतिनिधी 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानानं…

3 hours ago

पडोसन

पडोसन नावाचा विनोदी चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच.... एक -एक पात्र अतिशय विनोदी... तर अशीच…

9 hours ago

फुलोरा…

‘फार फार तर वारा बाहेरून येईल पण फुलून तर आतूनच यावे लागते..’ कविवर्य संजय चौधरी…

9 hours ago

श्रद्धा, ट्रेंड आणि माणूस

नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…

9 hours ago

आवडता कोपरा

खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…

9 hours ago

खंजीर आणि खाज

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…

9 hours ago