नाशिक

शतकोत्तर इतिहास लाभलेली नगिना मशीद नव्या रूपात

मनमाडचे वैभव : पारंपरिक इस्लामिक वास्तुकलेचा उत्कृष्ट संगम

मनमाड : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहर हे केवळ रेल्वे जंक्शन म्हणून नाही, तर आता ऐतिहासिक आणि वास्तुकलेच्या सौंदर्यासाठीही ओळखले जाऊ लागले आहे. शहरातील 100 वर्षांपेक्षा जास्त जुनी असलेली नगिना मशीद आता केवळ शहराचेच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचे आकर्षण ठरत आहे. या ऐतिहासिक मशिदीचे नुकतेच देखणे नूतनीकरण करण्यात आले आहे. रमजान महिन्याच्या पवित्र मुहूर्तावर ती भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे.
नगिना मशीद शहरातील इंदूर-पुणे महामार्गावर आहे. अनेक वर्षांपासून या मशिदीचे नूतनीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, यंदा ते करण्यात आले आणि अतिशय देखणं रूप बघायला मिळाले. रमजान ईदच्या पूर्वसंध्येलाच अनोखे गिफ्ट मिळाले आहे.
नगिना मशीद ही मनमाडमधील सर्वांत जुन्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे. एका शतकाहून अधिक काळ या मशिदीने शहराचा इतिहास जवळून पाहिला आहे. काळाच्या ओघात मशिदीच्या मूळ वास्तूला डागडुजीची गरज होती, ज्याचा विचार करून मशीद ट्रस्टने या भव्य नूतनीकरणाचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, ज्या कामाला वर्ष लागणार ते काम अवघ्या तीन महिन्यांत पूर्ण झाल्याने आश्चर्याचा धक्का बसला. मशिदीचे नवीन रूप हे आधुनिकता आणि पारंपरिक इस्लामिक वास्तुकलेचा एक उत्कृष्ट संगम आहे. नूतनीकरणानंतर या मशिदीचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.
मशिदीच्या आतील भागात आकर्षक छतावरील नक्षीकाम (फाल्स सीलिंग), आधुनिक झुंबर आणि वॉर्म लाइटिंगचा वापर केला आहे, ज्यामुळे प्रार्थनेच्या वेळी एक शांत आणि प्रसन्न वातावरण निर्माण होते.
उन्हाळ्याच्या दृष्टीने खास वातानुकूलितदेखील करण्यात आले आहे. प्रार्थनेसाठी (नमाज) प्रशस्त हॉल तयार केला असून, तिथे उच्च दर्जाचे गालिचे आणि स्तंभ उभारण्यात आले आहेत. मशिदीच्या भिंतींवर आणि कमानींवर केलेले बारीक नक्षीकाम हे वास्तुकलेचा उत्तम नमुना सादर करते. जिल्ह्यातील सर्वांत सुंदर मशीद म्हणूनदेखील तिचा उल्लेख करण्यात येत आहे.

रमजानची खास भेट

रमजान महिन्याच्या सुरुवातीलाच ही मशीद नूतनीकरणानंतर जनतेसाठी खुली केली. ज्यामुळे स्थानिक मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रमजानच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेता, येथे सर्व प्रकारच्या सोयीसुविधांचे नियोजन केले आहे. ही मशीद आता केवळ एक प्रार्थनास्थळ नसून, मनमाडच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवात भर टाकणारे महत्त्वाचे स्थान बनली आहे. या मशिदीच्या सौंदर्याची चर्चा आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र होत आहे.

Nagina Mosque, with a century-old history, gets a new look

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निकाल

- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…

4 hours ago

देशातील तपास यंत्रणा

- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्‍यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…

4 hours ago

साखर कारखानदारीची घरघर थांबणार कधी?

- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…

4 hours ago

…आणि मी प्रेमात पडतो!

- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…

4 hours ago

समाजकल्याण की कोटकल्याण?

- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…

4 hours ago

दिवाळीचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू द्या!

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…

4 hours ago