शिवसेना पक्ष निरीक्षकपदी धनराज महाले

शिवसेना पक्ष निरीक्षकपदी धनराज महाले

दिंडोरी :  प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणूकांच्या दृष्टीने निवडणूक प्रभारी आणि दिंडोरी – पेठ विधानसभा शिवसेना पक्ष निरीक्षकपदी माजी आमदार धनराज महाले यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
हिंदुह्दयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेनेचे मुख्य नेते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ंयांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सदस्य नोंदणी अभियान, मतदार नोंदणी अभियान, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी योजना, तसेच महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबविल्या जाणार्‍या सर्व शासकीय योजनांबाबत अंमलबजावणीबाबत, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना आदी योजनांच्या माहिती गोरगरीब जनतेंपर्यंत पोहचविण्यासाठी व त्यांना मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, असे आश्‍वासन नवनियुक्त पक्ष निरीक्षक माजी आमदार धनराज महाले यांनी दिले. त्यांच्या निवडीबद्दल शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख सुनील पाटील, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, सुरेश डोखळे, संपतराव घडवजे, मंगला भास्कर, अमोल कदम, सुरेश देशमुख, बाळासाहेब मुरकूटे, बाळासाहेब धुमणे, बाळासाहेब दिवटे, शाम बोडके, संतोष कहाणे, योगेश दवंगे, गणेश दवंगे, सुरज राऊत, सागर गायकवाड, रवि सोनवणे, सागर पगारे, नंदु बोंबले, बाबु मनियार, माणिकराव भुसारे, पद्माकर कामडी, गोपाल देशमुख, पप्पु राऊत, नरेंद्र जाधव, सुजित मुरकूटे, योगेश तिडके, शाम मुरकूटे, प्रमोद देशमुख, मनोज ढिकले, नंदु गटकळ, हिरामण भोये, मनोहर चौधरी, धर्मराज चौधरी, कैलास चौधरी, प्रदीप घोरपडे, पप्पु मोरे, हेमंत पगारे, माणिकराव दवंगे, दशरथ ठेपणे, सुरज गोजरे, शेखर देशमुख, दत्तू लोखंडे, प्रभाकर वडजे किरण तिवारी, गुलाब जमधडे, सचिन उगले, संजय ढगे, सचिन कापसे, जालिंदर गायकवाड, गोविंद बोडके, अरुण बोरस्ते आदींसह महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

View Comments

  • मा.श्री.धनराज हरिभाऊ महाले. ( भाऊ ) तुमचे सर्व प्रथम अभिनंदन " शिवसेना पक्ष निरीक्षक पदी दिंडोरी - पेठ विधानसभा " प्रथम गणरायाला वंदन, कुलदेवतेला वंदन करून,हात जोडून चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो की तुम्हाला महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळणारच यात तिळमात्र शंका नाही, कारण,माझी देवावर खूप श्रद्धा आहे आणि ती राहणारच. " मा.हिंदु हृदय सम्राट स्व.मा.बाळासाहेब ठाकरे साहेब, स्व.मा.आनंद दिघे साहेब आणि मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब ( शिवसेना मुख्य नेते ) यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेच राहो, आणि भाऊ तुम्हाला आदिवासी समाजातील गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी मिळो,हि पुन्हा एकदा तेहतीस कोटी देवांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना💐🙏

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago