नाशिक : प्रतिनिधी
मुंबईतील शिवाजी पार्क येथे माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केल्याची घटना बुधवारी (दि. 17) घडली. दरम्यान, त्याचे पडसाद नाशिकमध्येही उमटले. संतप्त शिवसैनिकांनी शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे एकत्र येत या घटनेचा निषेध नोंदवला. आंदोलन करत राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पदाधिकार्यांनी माँसाहेबांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून दुग्धाभिषेक केला. जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, राज्य संघटक विनायक पांडे, माजी आमदार वसंत गिते, उपजिल्हाप्रमुख भय्या मणियार, दिलीप मोरे, विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, सुभाष गायधनी, समन्वयक शैलेश सूर्यवंशी, सचिव मसूद जिलानी, स्वाती पाटील, कीर्ती जवखेडकर, योगिता गायकवाड, कीर्ती निरगुडे, शोभा दोंदे आदी उपस्थित होते. शिवसेना पदाधिकारी सचिन बांडे, सुनील जाधव, सागर भोजने, राजेंद्र गोतिसे, ऋतराज पांडे, रितेश साळवे, संदेश फुले, गोरख वाघ, विशाल कदम, संजय परदेशी, अशोक पारखे, संजय चिंचोरे, वीरेंद्र टिळे, सुनील निरगुडे, सुभाष शेजवळ, प्रवीण चव्हाण, आकाश उगले, वैभव ढिकले, राजू राठोड, रवींद्र गामणे, देवा वाघमारे व शिवसेना पदाधिकारी, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
खा. राजाभाऊ वाजेंकडून निषेध
दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी व शिवसैनिकांच्या हृदयातील आदरणीय मातृशक्ती माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर मुंबईत अज्ञाताकडून लाल रंग टाकण्याची घृणास्पद व संतापजनक घटना बुधवारी (दि. 17) घडली. या कृत्यामुळे राज्यातील शिवसैनिक, ठाकरे कुटुंबीय व जनसामान्यांच्या भावना दुखावल्या असून, समाजात अस्वस्थता निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला आहेे. लोकमान्य वंदनीय व्यक्तिमत्त्वांचा अपमान करणे ही समाजकंटक वृत्तीची नीच मानसिकता आहे. आपण या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. कारस्थान करणार्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मुंबई पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे. मीनाताई ठाकरे यांचा पुतळा हा शिवसैनिकांच्या आदराचा, श्रद्धेचा आणि प्रेरणेचा स्रोेत आहे. त्यांचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही, असे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik