नाशिक

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या दिवशी शिवसेनेचा  मोर्चा

नाशिक : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या दौेर्‍यादिवशीच शिवसेना बाळा कोकणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निशेषार्थ पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढणार आहे. अशी माहिती शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली आहे.   शहरात काही दिवसापूर्वी रात्रीच्या सुमारास मध्य नाशिक शिवसेनेचे विधानसभा प्रमुख निलेश उर्फ बाळा कोकणे यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला होता. हा हल्‍ला शिंदे गटातील लोकांकडून करण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे.  येत्या तीन दिवसात हल्ल्यातील आरोपींवर कारवाई  करावी संशयतीना अटक  करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौर्‍यावर येणार त्याच दिवशी पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढला जाणार असल्याचे बडगुजर यांनी सांगितले.
Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

18 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

18 hours ago