शिंदे समर्थकाच्या बॅनरला शिवसैनिकांनी फासले काळे

नाशिक : प्रतिनिधी
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळत असून, विजय ममता चौकात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ त्यांचे समर्थक योगेस म्हसके यांनी लावलेल्या फलकाला शिवसैनिकांनी काळे फासत त्यावर गद्दार असे लिहिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नाशिक-पुणे रोड वरील आंबेडकरनगर परिसरात योगेश म्हस्के यांनी काल एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावला होता. आज सकाळी शिवसैनिक या ठिकाणी जमले आणि त्यांनी या फलकाला काळे फासले. तसेच योगेश म्हसके, सुजित जिरापुरे यांच्या नावापुढे गद्दार असे लिहिले. यावेळी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी पोलीस आल्याने शिवसैनिकांनी पळ काढला. शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.योगेश बेलदार, सचिन बाडे, देवा जाधव , उमेश चव्हाण, बाळासाहेब कोकणे आदी सह महिला शिवसैनिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *