सापुतारा येथे डोंगरावरून उडी घेत तरूणाची आत्महत्या

सुरगाणा: प्रतिनिधी
एकतर्फी प्रेमातून निराश झालेल्या गुजरात मधील १९ वर्षीय युवकाने टोकाची भूमिका घेत सापुतारा येथील टेबल पॉ॑ईंट (उंच डोंगरावरून) दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या वेळी घडली.
मयताचे नाव सोनीस देवचंदभाई गामित (१९) असे असून तो आसनगाव ता. सोनगढ जि.तापी येथील रहिवासी आहे. सिलास शिंगाभाई गामित यांनी सुरगाणा पोलिसांना सदर घटनेची खबर दिली. सुरगाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत सोनीस गामित हा १५ जून रोजी त्याची मोटारसायकल क्र. जीजे २६ एल ६७९८ घेऊन घरातून बाहेर पडला होता. तो घरी परत न आल्याने कुटुंबियांकडून सोनगढ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली होती. त्याची मोटारसायकल सापुतारा येथील टेबल पॉ॑ईंट वर दिसून आल्याने त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. दरीचा भाग सुरगाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तपास केला असता सुरगाणा तालुक्यातील दरीच्या बाजूने असलेल्या श्रीभूवन – मोठामाळ शिवारात डोंगराच्या पायथ्याशी सोनीसचा मृतदेह दि.२२ जून रोजी मिळून आला. त्याने एकतर्फी प्रेमातून आत्मत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *