दुकान फोडून 67 हजारांचा मुद्देमाल चोरीला

सिडको : विशेष प्रतिनिधी
सातपूर एमआयडीसी परिसरातील एका ट्रेडिंग दुकानाचे दरवाजे तोडून अज्ञात चोरट्यांनी पितळी साहित्य आणि रोकड असा 67 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रकाश रामस्वरूप पोटोदिया (वय 54, रा. चेरी हिल्स, गंगापूर रोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ते सातपूर एमआयडीसी परिसरातील एकवलो पॉइंट, अशोका बिल्डिंग येथे ‘प्रकाश ट्रेडिंग’ नावाचे दुकान चालवितात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 मे रोजी रात्री सव्वाआठ ते 27 मे रोजी सकाळी साडेआठ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या वरच्या मजल्यावरील मागील बाजूचा लाकडी दरवाजा तोडून आत
प्रवेश केला.
त्यानंतर आतील लोखंडी सेफ्टी डोअर आणि लोखंडी पत्र्याचे कुलूप तोडून दुकानातील विविध प्रकारचे पितळी साहित्य तसेच विविध मूल्यांची नाणी असा एकूण 67 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेला.
चोरीस गेलेल्या मालामध्ये ब्रास फेरुल, ब्रास नट, होज जॉइंट, निपल, बॉल व्हॉल्व्ह, अ‍ॅडॉप्टर, कपलिंग यांसारख्या विविध पितळी वस्तूंचा समावेश आहे. तसेच दुकानातील एक, दोन, पाच, दहा आणि वीस रुपयांची नाणी मिळून सुमारे दहा हजार रुपयांची रोकडही चोरट्यांनी लंपास केली.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shop broken into, goods worth Rs 67,000 stolen

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *