देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
देवळाली कॅम्प परिसरात सतत सुरू असलेल्या वीजपुरवठ्याच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले असून, त्यात महावितरणचा गलथान कारभारही समोर येत आहे. महावितरणच्या निष्काळजी कारभाराचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. संसरी नाका परिसरातील देवी किशनचंद दौलतानी यांचा ‘मनीषा बंगलो’ तसेच बाजूला असलेल्या या बंगल्यांमध्ये बुधवारी (दि. 21 जानेवारी 2026) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटची घटना घडली.
रस्त्यावरून जाणार्या हाय व्होल्टेज वीज केबल्स घरातील वीजपुरवठ्याच्या केबल्सला धडकल्याने अचानक शॉर्टसर्किट झाले. या घटनेत घरातील स्टेबलायझर, फ्रीज तसेच घरातील कन्सील वायरिंगचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विशेष म्हणजे, हाय व्होल्टेज केबलच्या अगदी जवळ अंतरावरून दुसरी केबल जाणे ही गंभीर बाब असून, महावितरणकडून आवश्यक सुरक्षिततेची उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचे यावरून स्पष्ट होते. घरातील विद्युत उपकरणे जळून खाक झाल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेमुळे देवळाली कॅम्पमधील महावितरण कंपनीचा गलथान आणि निष्काळजी कारभार पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला असून, नागरिकांकडून तात्काळ तपासणी व नुकसानभरपाईची मागणी केली जात आहे.
ही घटना घडल्यानंतर आम्ही तात्काळ महावितरणाच्या देवळालीतील कार्यालयात गेलो असता, तिथं एकही कर्मचारी ड्युटीवर दिसला नाही, ही अत्यंत दुःखद बाब आहे. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे कोणाचा जीव गेला असता तर याला जबाबदार कोण?
– वरुण दोलतानी, स्थानिक रहिवासी, मनीषा बंगला, दे. कॅम्प
Short circuit in two bungalows in Deolali
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…