उमराळे बुद्रुक : वार्ताहर
नाशिक-पेठ महामार्गातील सावळ घाट येथील म्हसोबा महाराज वळणावर गुरुवारी (दि. 22) पहाटे चारच्या सुमारास आयशर गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर हे वाहन सुरक्षारक्षक भिंतीला जाऊन धडकल्याने वाहनाच्या इंजिनने अचानक पेट घेतला होता. मात्र, यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. चाचडगावचे समाजसेवक ज्ञानेश्वर पेलमहाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी आपला पाण्याचा टँकर पाठवून आग आटोक्यात आणली. या आगीत जळून जाणारा ट्रक आगीच्या विळख्यातून वाचविण्यास यश आले. ही घटना पहाटे चारच्या सुमारास घडली. रात्रीच्या वेळेस नाशिक-पेठ गुजरात महामार्गावर वाहतूक कमी असल्याने आगीवर वेळेत नियंत्रण मिळविण्यात आले. तसेच स्थानिक पोलीस यंत्रणा ही वेळेत पोहोचल्याने आग विझवण्यास मदत झाली.
Eicher vehicle catches fire near Saval Ghat
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…