महाराष्ट्र

‘शक्तिप्रदर्शन’ अयशस्वी

नवी दिल्ली/मुंबई : प्रतिनिधी
पक्ष फुटीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत बोलावलेली महत्त्वाची संसदीय बैठक आणि ‘शक्तिप्रदर्शन’ अपयशी ठरल्याचे चित्र समोर आले आहे. पक्षाने व्हीप जारी करूनही 9 पैकी अवघ्या 3 खासदारांनीच या बैठकीला हजेरी लावली. उर्वरित 6 खासदारांच्या या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या सर्व प्रकरणाला आता कायदेशीर वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या 6 खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, हे खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेना वर्धापनदिनी आपला गट तिकडे विलीन करतील, अशीही चर्चा आहे. या खासदारांच्या गटाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलेल्या पत्रात, ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याची भीती व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिवसेना (यूबीटी) पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन करून बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या 6 खासदारांवर शिस्तभंगाची आणि अपात्रतेची कारवाई होणार का, याबाबत कायदेशीर खल आता सुरू झाला आहे.
प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ आणि भाजपचे नेते उज्ज्वल निकम यांनी कायदेशीर तरतुदींवर महत्त्वाची माहिती दिली आहे. निकम यांच्या मते, पक्षाचा अधिकृत व्हीप धुडकावणे हा पक्षशिस्तीचा भंग मानला जातो. मात्र, संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या सभागृहाबाहेर (उदा. हॉटेल किंवा खासगी बैठकांमध्ये) झालेल्या व्हीपच्या उल्लंघनावर थेट अपात्रतेची कारवाई करणे, कायदेशीरदृष्ट्या गुंतागुंतीचे असते. जर या खासदारांनी सभागृहात पक्षाच्या आदेशाविरुद्ध मतदान केले किंवा तटस्थ भूमिका घेतली तरच पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत थेट अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते.
राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
पक्षाच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला दोन तृतीयांश (6 खासदार) अनुपस्थित राहिल्यामुळे शिवसेना ठाकरे गोटात चिंतेचे वातावरण आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, या 6 खासदारांची अनुपस्थिती केवळ वैयक्तिक कारणांमुळे नसून, त्यामागे मोठे राजकीय संकेत असू शकतात. महायुती किंवा इतर राजकीय घटकांकडून पडद्याआड सुरू असलेल्या हालचालींमुळे हे खासदार पक्षनेतृत्वावर नाराज आहेत की काय, अशी शंका घेतली जात आहे. संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच ठाकरेंच्या छावणीत पडलेली ही उभी फूट ठाकरे गटासाठी दिल्लीतील राजकीय वजन कमी करणारी ठरू शकते. या अंतर्गत बंडखोरी किंवा नाराजीवर उद्धव ठाकरे काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 6 खासदारांवर अधिकृतपणे नोटीस बजावून स्पष्टीकरण मागवले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

 

 

 

‘Show of strength’ unsuccessful

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago