महाराष्ट्र

बंडखोर खासदारांना ‘वाय प्लस’ सुरक्षा

मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे 6 लोकसभा खासदार फुटून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. या संभाव्य मोठ्या फुटीवर संतप्त प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांना थेट रस्त्यावर उतरून धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे.
आमची लढाई आता लोकसभेत, कोर्टात आणि रस्त्यावरही चालेल; आता रस्त्यावरची लढाई सुरू झाली असून, आमचे ‘ऑपरेशन तुडवा’ सुरू होणार, असा अत्यंत आक्रमक आणि गर्भित इशारा संजय राऊत यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत दिला. गटनेते अरविंद सावंत यांनीही खासदार किंवा आमदार फुटला तर त्याला रस्त्यात तुडवा, या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जुन्या विधानाचा हवाला देत बंडखोरांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला
आहे.
संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या या आक्रमक भूमिकेनंतर आणि ‘ऑपरेशन तुडवा’च्या धमकीची गंभीर दखल घेत राज्य गृह विभागाने तातडीने पावले उचलली आहेत. राज्य गुप्तवार्ता विभागाने (एसआयडी) जारी केलेल्या आदेशानुसार, सुरक्षेच्या कारणास्तव ठाकरे गटातून बाहेर पडण्याच्या तयारीत असलेल्या 6 खासदारांना तातडीने ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. यामध्ये खासदार संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. संभाव्य कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता, स्थानिक पातळीवरील सुरक्षा समित्या या खासदारांच्या सुरक्षेचा पुढील आढावा घेतील. चार वर्षांतील शिवसेनेतील ही दुसरी मोठी फूट मानली जात असून, यामुळे राज्याचे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. बंडखोर खासदारांना ‘वाय प्लस’ सुरक्षा संजय दिना पाटील, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 hour ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 hour ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 hours ago