जिवे ठार मारण्याचा प्रयत्न आणि जबरी चोरीचा दाखल होता गुन्हा
सिडको : विशेष प्रतिनिधी
जिवे ठार मारण्याचा प्रयत्न आणि जबरी चोरी या दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला पाटणकर टोळीतील सराईत गुन्हेगार श्रवण पगारे यास गुंडाविरोधी पथक, गुन्हे शाखा, नाशिक शहर यांनी नवी मुंबई येथून अटक केली आहे.
7 डिसेंबर 2025 रोजी फिर्यादी आदित्य दीपक कांबळे यांना श्रवण पगारे, हर्षद पाटणकर आणि अजय पाटणकर यांनी जबर मारहाण करून शर्टच्या खिशातील बाराशे रुपये लुटले होते. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. आरोपींनी पिस्तुलाचा धाक दाखवत फिर्यादीचा जीव घेण्याची धमकी दिली होती.
या गंभीर गुन्ह्याचा तपास जलद गतीने करत असताना पोलिस कर्मचारी घनश्याम महाले यांना मिळालेल्या माहितीवरून पथकाने नवी मुंबईतील कामोठे परिसरात शोधमोहीम राबवली. आरोपी श्रवण पगारे हा आयटॉक्स जिम, सेक्टर 12, कामोठे येथे ट्रेनर म्हणून काम करत असल्याचे समोर आले. त्यानुसार सापळा रचून पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच यापूर्वी सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या आणखी एका गंभीर गुन्ह्यात सहभागी असल्याचे उघड केले.
अटक करण्यात आलेल्या श्रवण पगारे यास पुढील तपासासाठी सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले आणि सुनीता कवडे यांनी केली.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…