सिडको : विशेष प्रतिनिधी
जबरी चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये मागील चार वर्षांपासून फरार असलेला आणि रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार किरण रतन गुजर पाटील याला गुन्हे शाखा, युनिट क्रमांक 2, नाशिक शहर यांनी अटक केली असून, त्याच्याकडून चोरीची मोपेड गाडी व लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.
गोपनीय माहितीनुसार, इंदिरानगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांतील फरार आरोपी किरण गुजर पाटील हा गामणे मळा परिसरात चोरीची अॅक्टिव्हा मोपेड व लॅपटॉप विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने माउलीनगरजवळ सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून होंडा कंपनीची ग्रे रंगाची अॅक्टिव्हा मोपेड (एमएच 14 एफई 1242) आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला. चौकशीत आरोपीने मोपेड आणि लॅपटॉप पिंपरी, पुणे येथून चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, जप्त मालाची किंमत सुमारे 80 हजार रुपये आहे.
किरण गुजर पाटील हा इंदिरानगर पोलिस ठाण्यातील जबरी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याने वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पुढील तपासासाठी इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही कामगिरी सपोनि हेमंत तोडकर, सपोनि डॉ. समाधान हिरे, सपो उपनिरीक्षक संजय सानप, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, वाल्मीक चव्हाण, प्रकाश महाजन, महेश खांडबहाले, जितेंद्र वजीरे आणि सुनील खैरनार यांनी केली.
समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…
बांधकामांवर पाण्याचा वारेमाप वापर, सिंहस्थ कुंभमेळ्यावरही परिणाम त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी पावसाने वेळेआधीच माघार घेतल्याने आणि…
निफाड : तालुका प्रतिनिधी यंदा अत्यल्प पाऊस असतानाही शेतकर्यांनी महागडी औषधे, कीटकनाशके व पोषकांची फवारणी…
नागरिकांच्या धाडसामुळे टळला अनर्थ; भीतीचे वातावरण दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव धूम येथे बिबट्याने…
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी मालेगाव : प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह मतदार यादीच्या…
तीन ट्रक विविध साहित्य जप्त सिडको : प्रतिनिधी सिडको विभागातील फुटपाथवर करण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात…