इंदिरानगर : वार्ताहर
आंबे पाडत असताना विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना इंदिरानगर येथे घडली.
अनिरुद्ध अनिल धुमाळ ( वय – ३० वर्षे, रा. शिवनेरी बंगला, कलावती माता मंदिराजवळ, इंदिरानगर) हा तरुण सकाळी सात वाजेच्या सुमारास घराजवळ असलेल्या झाडाचे लोखंडी पाईपने आंबे पाडत होता. आंब्याच्या झाडाजवळ विजेची तार होती. त्या तारेला लोखंडी पाइप लागल्याने त्याला वीजेचा जोरदार धक्का लागला. त्यामुळे त्याच्या दोन्ही पायाला, पोटाला दुखापत झाल्याने वडील अनिल धुमाळ यांनी उपचारासाठी त्याला नजीकच्या दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी त्याला तपासले असता मृत घोषित केले . सदर घटनेची इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.