नाशिक

जिल्ह्यात अतितीव्र कुपोषणात लक्षणीय घट

प्रशासनाच्या पोषणदूत उपक्रमाला यश; 39 अतितीव्र कुपोषित बालके नॉर्मल श्रेणीत

नाशिक ः प्रतिनिधी
जिल्ह्यात कुपोषण निर्मूलनाच्या दिशेने प्रशासनाने उचललेले पाऊल यशस्वी ठरत आहे. पोषणदूत योजनेमुळे अवघ्या काही महिन्यांत 39 अतितीव्र कुपोषित बालके नॉर्मल श्रेणीत आली आहेत. नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली दि. 15 ऑगस्ट 2025 पासून राबविण्यात येणार्‍या या अभिनव योजनेचे सकारात्मक परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहेत.
या पाश्वर्र्भूमीवर मंगळवारी (दि.3) जिल्हा परिषद नाशिक येथे आरोग्य विभाग व महिला व बाल विकास विभागाच्या संयुक्त समन्वय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत योजनेच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
नोव्हेंबर-2025 अखेर जिल्ह्यातील एकूण 208 अतितीव्र कुपोषित बालकांपैकी 39 बालके नॉर्मल श्रेणीत, तर 45 बालके मध्यम कुपोषित श्रेणीत परिवर्तित झाली आहेत. हे या योजनेचे मोठे यश असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी नमूद केले. उर्वरित बालकांवर तसेच डिसेंबर 2025 मध्ये पोषण ट्रॅकरवर नव्याने नोंद झालेल्या 368 बालकांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी बैठकीत कुपोषित बालकांची नियमित आरोग्य तपासणी, आवश्यक औषधोपचार, संदर्भ सेवा, मासिक गृहभेटी, एनआरसीमध्ये भरती, व्हीसीडीसीमधील आहार उपलब्धता, हिमोग्लोबिन तपासणी, लसीकरण, तसेच स्थलांतरित कुटुंबातील बालकांसाठी विशेष समन्वय याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कुटुंबकल्याण पद्धती आणि दोन अपत्यांमधील अंतर राखण्याबाबत पालकांचे समुपदेशन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रताप पाटील, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहेते, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे, युनिसेफचे विभागीय सल्लागार नितीन वसईकर यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

Significant reduction in severe acute malnutrition in the district

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

9 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

10 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

10 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

10 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

10 hours ago