, मुंबई, राज्यपाल भगत सिंह कोशारी यांनी सरकारला उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे, शरद पवार यांनी तातडीने सिल्व्हर ओक वर बैठक बोलावली आहे, या बैठकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते या बैठकीला पोचले आहेत, दुसरीकडे मातोश्री वरही संजय राऊत आणि शिवसेना नेते एकत्र येऊन रणनीती ठरवत आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजीनामा देणार नाहीत, विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे, दुसरीकडे शिवसेनेने राज्यपाल कोशारी यांच्या निर्णय विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे, शिवसेनेच्या 16 आमदारांच्या आपत्रतेविषयीची याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे त्यामुळे बहुमत चाचणी घेण्यास सांगणे चुकीचे आहे या मुद्द्यावर याचिका दाखल करण्यात आली आहे, शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली असून त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी याचिकेत केली आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्ट आता काय निर्णय देणार याकडे लक्ष लागले आहे,