मुंबई,:
शिवसेनेच्या 16 आमदारांच्या आपत्रतेविषयीची याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे त्यामुळे बहुमत चाचणी घेण्यास सांगणे चुकीचे आहे या मुद्द्यावर याचिका दाखल करण्यात आली आहे, सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर 5 वाजता सुनावणी घेऊ असे सांगितले आहे, दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे,
शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली असून त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी याचिकेत केली आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्ट आता काय निर्णय देणार याकडे लक्ष लागले आहे,