ठेवीदारांना रकमेचे वाटप; थकीत कर्जदारांच्या मालमत्तांवर कारवाई तीव्र
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर नागरी पतसंस्थेच्या थकीत कर्जदारांविरोधातील वसुली मोहिमेला वेग आला असून, मागील दोन महिन्यांत विविध ठिकाणच्या मालमत्तांचा यशस्वी लिलाव करून सुमारे 15 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, लिलावावेळी उपस्थित असलेल्या ठेवीदारांना तत्काळ रकमेचे वाटप करण्यात आल्याची माहिती सहाय्यक निबंधक संजय षगते यांनी दिली.
ठेवीदारांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत बोलताना गिते यांनी सांगितले की, शासकीय नियमानुसार प्रत्येक प्रकरणात तीन वेळा लिलाव प्रक्रिया राबविणे आवश्यक असल्याने काही प्रकरणांमध्ये आणखी दोन लिलाव बाकी आहेत. आतापर्यंत झालेल्या लिलावांतून मिळालेल्या रकमेपैकी लिलावात सहभागी झालेल्या तसेच उपस्थित असलेल्या ठेवीदारांना प्रत्येकी दहा हजार रुपयांपर्यंत वाटप करण्यात आले आहे.
बैठकीस विशेष वसुली अधिकारी अजय शेंडे, व्यवस्थापक शेळके यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी गिते यांनी सांगितले की, थकीत कर्जदारांच्या मालमत्तांपैकी सहा प्रकरणे संस्थेच्या नावे अधिकृतपणे हस्तांतरित करण्यात आली आहेत. तसेच संस्थेच्या माजी संचालक मंडळाच्या स्थावर मालमत्तेचा व्यापक शोध घेण्यात येत असून, सुमारे 25 कोटी रुपयांच्या मालमत्तांचा शोध लागला आहे. या मालमत्तांवर नियमानुसार बोजा नोंदविण्याची कार्यवाहीही पूर्ण करण्यात आली आहे.
पुढील महिन्यातही लिलावाची प्रक्रिया सुरू राहणार असून, कोणाचीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा गिते यांनी दिला. यावेळी ठेवीदारांनी शासनाकडे माजी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासारखा स्वच्छ, प्रामाणिक, धडाडीचा आणि कुणाचीही गय न करणारा अधिकारी सहकार विभागात नियुक्त करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला. वसुली प्रक्रियेला वेळ लागत असला तरी सहाय्यक निबंधक संजय गिते, विशेष वसुली अधिकारी अजय शेंडे, व्यवस्थापक शेळके तसेच भुसे हे अधिकारी व कर्मचारी सातत्याने सहकार्य करत असल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. समन्वयक डॉ. जी. एल. पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. बैठकीस राजेंद्र घोगे, रवींद्र घोगे, ज्येष्ठ पत्रकार सुभाष जाजू, भाऊसाहेब सांगळे, देवीदास जाधव, सुरेश शेळके, पंढरीनाथ सांगळे, सुदाम सांगळे, मधुकर ससले, दत्तात्रय डोंगरे, प्रकाश शिरसाट, निवृत्ती बर्डे, अजय शेंडे, बी. डी. पवार, निवृत्ती डावरे, दुर्गेश मालपाठक, सुबोध वाईकर, विजय कदम, अविनाश खालकर, अशोक वाघ, म्हाळू भाबड, इंदुबाई लोंढे, शांता लोंढे आदींसह ठेवीदार उपस्थित होते.
‘Sinnar Nagari’ recovers ₹15 lakh through auction.
- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…
- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…
- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…
- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…
तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…
रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…