तिरंगा हातात घेत सिन्नरकर रस्त्यावर

भाजपच्या रॅलीला प्रतिसाद

माजी सैनिकांचा सन्मान

विद्यार्थी, महिला व नागरिकांचा मोठा सहभाग

सिन्नर : प्रतिनिधी
देशभक्तीचा जागर आणि राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचा संदेश देत भारतीय जनता पक्षाच्या वतीने सिन्नर शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली. हुतात्मा स्मारकापासून सुरू झालेल्या या रॅलीत विद्यार्थी, महिला, नागरिक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. ‘भारत माता की जय’च्या जयघोषाने शहरातील वातावरण देशभक्तिमय झाले.
जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, युवा नेते उदय सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष सजन सांगळे यांच्या नेतृत्वाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले. हुतात्मा स्मारकापासून सुरू झालेली रॅली क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक, एकलव्य पुतळा मार्गे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. यावेळी भारतीय सैन्यदलातील माजी जवानांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप झाला.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
तिरंगा रॅली समितीसह के. व्ही. एन. नाईक विद्यालय, चांडक कन्या विद्यालय, ज्ञानदा करिअर अकॅडमी आणि सह्याद्री करिअर अकॅडमीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रॅलीत सहभाग घेतला. नागरिक आणि माजी सैनिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती
रॅलीत जिल्हा सरचिटणीस रणजित देशमुख, शरद कासार, सुनील माळी, तालुका प्रभारी ज्ञानेश्वर कुर्‍हाडे, माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, प्रांतिक सदस्य सविता कोठुरकर, नगरसेवक अनिल सरवार, आशा कर्पे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष किरण लहाने, तालुका मंडलाध्यक्ष बहिरू दळवी, जिल्हा उपाध्यक्ष रमेश नागरे, जिल्हाचिटणीस मिरा सानप, संजय सानप, महिला जिल्हा उपाध्यक्ष कल्पना आव्हाड, युवा मोर्चा अध्यक्ष वेदांत काळे, जिल्हा सरचिटणीस योगिता खताळे, प्रियंका द्विवेदी, महिला युवा मोर्चा शहराध्यक्ष देवयानी वाघ यांच्यासह ज्येष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सुभाष कर्पे, भाऊसाहेब शिंदे, दिनकर कलकत्ते, माजी सैनिक सेल अध्यक्ष मधुकर सोनवणे, बाळासाहेब बोडके, बाळू कराड, मुकुंद खर्ज, कन्हैया वरंदल, निलेश लोणारे, योगेश सानप, रामचंद्र रोडे, रुपेश मुठे, डॉ. आनंद सानप, डॉ. तुषार सोनवणे, सतीश सानप, सिद्धेश भुसा, ऋषिकेश तुपे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उदय सांगळे यांनी रॅलीला संबोधित केले, तर जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी मार्गदर्शन केले.

Sinnar residents take to the streets holding the Tricolour.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *