खरीप वार्यावर, 63 हजार हेक्टरपैकी अवघ्या 679 हेक्टरवर पेरणी
♦ जूनमध्ये सरासरीच्या अवघा 45.5 टक्के पाऊस
♦ गेल्या वर्षाच्या तुलनेत 55 टक्के तूट
♦ 63 हजार हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट
♦ प्रत्यक्ष पेरणी फक्त 679 हेक्टर
♦ पेरणीचे प्रमाण अवघे 1.08 टक्के
♦ तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीची चाहूल, शेतकरी चिंतेत
भरत घोटेकर : सिन्नर
पावसाने यंदा सुरुवातीलाच दगा दिल्याने सिन्नर तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. जून महिन्यात सरासरीच्या निम्माही पाऊस न झाल्याने खरीप पेरण्या अक्षरशः ठप्प झाल्या आहेत. कृषी विभागाने 63 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवले असताना 2 जुलैपर्यंत केवळ 679 हेक्टर क्षेत्रावरच पेरणी होऊ शकली आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीची चाहूल लागली असून, शेतकर्यांचे लक्ष आता आकाशाकडे लागले आहे.
सिन्नर तालुक्याचा वार्षिक सरासरी पाऊस 522.4 मिलिमीटर आहे. जून महिन्यात सरासरी 123.9 मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना यंदा केवळ 56.4 मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे सरासरीच्या तुलनेत अवघा 45.5 टक्के पाऊस नोंदला गेला असून, 54.5 टक्के तूट निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षाच्या तुलनेतही यंदा 55 टक्के कमी पाऊस झाला आहे.
पावसाअभावी शेतकर्यांनी पेरणीचे नियोजन थांबवून ठेवले आहे. आतापर्यंत झालेल्या पेरणीत मक्याचे 364 हेक्टर, सोयाबीनचे 225 हेक्टर, बाजरीचे 65 हेक्टर आणि भुईमुगाचे 25 हेक्टर क्षेत्र समाविष्ट आहे. एकूण पेरणीचे प्रमाण उद्दिष्टाच्या अवघ्या 1.08 टक्क्यांवर पोहोचले आहे.
जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात दमदार पाऊस झाला तरच खरीप हंगामाला दिलासा मिळू शकतो. अन्यथा पिकांचे नियोजन, उत्पादन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता कृषी क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
पाऊस लांबल्यास दुहेरी फटका
जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने केवळ खरीप हंगामच नव्हे तर जनावरांच्या चार्याचा आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. शेततळी, विहिरी आणि लहान जलस्रोत आटले आहेत. दुसरीकडे पेरण्या रखडल्याने हिरव्या चार्याची उपलब्धताही कमी होण्याची चिन्हे आहेत. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास पशुपालकांसमोर चार्याचे संकट उभे राहू शकते. तसेच ग्रामीण भागात टँकरची मागणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांचे लक्ष आता पावसाकडे लागले असून, प्रशासनाचीही लांबलेल्या पावसाने चिंता वाढवली आहे.
Sinnar was betrayed by rain
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…