नाशिक

सिन्नरची श्रावणी झाली ’इंडिगो’त कॅबिन क्रू

इंडिगो विमान कंपनीत रुजू

सिन्नर : प्रतिनिधी
सामान्य परिस्थितीत वाढलेल्या सिन्नर येथील श्रावणी स्वाती रघुनाथ शेलार हिने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आपले स्वप्न साकार केले आहे. अवघ्या 19 व्या वर्षी तिची इंडिगो विमान कंपनीत कॅबिन क्रू म्हणून निवड झाली आहे. 5 मार्च रोजी ती सेवेत रुजू
झाली आहे.
श्रावणीचे वडील रघुनाथ शेलार पूर्वी माळेगाव येथील एका खासगी कंपनीत कार्यरत होते. कंपनी बंद पडल्यानंतर त्यांनी खासगी इलेक्ट्रिशियन म्हणून काम सुरू केले. तिची आई गेल्या 25 वर्षांपासून सिन्नरमधील डॉ. विजय लोहारकर यांच्या रुग्णालयात आरोग्य सेविका म्हणून सेवा देत आहे. साध्या कुटुंबातील वातावरणात वाढलेल्या श्रावणीने लहानपणापासूनच मोठे स्वप्न पाहिले.
तिने दहावीपर्यंतचे शिक्षण सिन्नरमधील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पूर्ण केले. त्यानंतर अकरावी व बारावीचे शिक्षण संगमनेर येथील मालपाणी ज्युनिअर कॉलेजमध्ये घेतले. बारावीनंतर तिने विमान परिचारिका होण्याचा निर्णय घेतला आणि त्या दिशेने प्रयत्न सुरू केले.या क्षेत्रात संधी मिळवणे सोपे नसते. इंडिगोच्या प्रत्येक मुलाखतीसाठी सुमारे 800 ते 1000 मुली उपस्थित असत. निवड फक्त पाच जणींची होत असे. तरीही श्रावणीने हार मानली नाही. सामान्य परिस्थितीतून आलेल्या श्रावणीने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आकाशाला गवसणी घालत नवे पंख लेवून आकाशात यशाची भरारी घेतली.
यूट्यूब आणि ऑनलाइन अभ्यासक्रमांच्या माध्यमातून तिने स्वतःची तयारी केली आणि तब्बल 25 ते 30 वेळा मुलाखती दिल्या. अखेर तिच्या चिकाटीला यश आले आणि तिची निवड निश्चित झाली.
निवड झाल्यानंतर दिल्ली येथे कंपनीतर्फे तीन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान तिने सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक दोन्ही परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रशिक्षण पूर्ण केले. 5 मार्च रोजी ती अधिकृतपणे सेवेत रुजू झाली. विशेष म्हणजे, पहिल्याच दिवशी तिने मुंबई-गाझियाबाद ही विमानसेवा यशस्वीरीत्या पूर्ण केली.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

7 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

7 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

7 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

7 hours ago