नाशिक

केतन अग्रवाल मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशी

मुंबई : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ला परिसरात झालेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचे निर्देश तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले. आमदार सुनील शेळके यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून या घटनेची गंभीरता सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी या प्रकरणाची माहिती देताना, लोहगड किल्ला परिसरात केतन अग्रवाल या उद्योगपती तरुणाची नियोजनबद्ध पद्धतीने हत्या झाल्याचा आरोप आहे. यावर बोलताना तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याचे नमूद केले. तसेच या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करावी, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

उज्ज्वल निकम वकील
मुंबई : पुण्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल हत्याकांडाचा खटला आता फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार आहे. या संवेदनशील प्रकरणात गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले आहेत. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनीही या खटल्याचे काम पाहण्यासाठी आपली संमती दर्शवली आहे.

मोबाइलमधील मेसेज डिलिट केल्याचा खुलासा

केतन अग्रवाल खून प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर संशयित चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी मोबाइलमधील कॉल रेकॉर्ड व एकमेकांशी झालेले सर्व मेसेज डिलिट केल्याचे तपासात उघड झाले आहे. घटनेनंतर तीन दिवसांनी पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्या मोबाइलमध्ये परस्परांचे शेकडो मेसेज असल्याचे समोर आले असून, डिलिट केलेला डेटा आणि मेसेज पुनर्प्राप्त करण्यासाठी दोन्ही मोबाइल फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले.

SIT probe into Ketan Agarwal’s death

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

33 minutes ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

36 minutes ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

50 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

55 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

58 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 hour ago