महाराष्ट्र

ग्रामीण शाळांत 20 विद्यार्थ्यांमागे तीन शिक्षक

शाळांत मूलभूत सुविधा अन् डिजिटल कामकाजावर भर; विधान परिषदेत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी
विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात शालेय शिक्षण विभागाच्या अनुषंगाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आले. त्यातून ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे. राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2025-26 या संचमान्यता वर्षासाठी इयत्ता नववी आणि दहावीच्या वर्गांची एकत्रित पटसंख्या 20 किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास आता तीन शिक्षक अनुज्ञेय करण्यात येणार आहेत. यापूर्वी ही अट 40 विद्यार्थ्यांची होती, मात्र ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी दुसर्‍या गावात जावे लागू नये व त्यांचे शिक्षण थांबू नये, या उद्देशाने हा निकष शिथिल करण्यात आला आहे.
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी मूलभूत सुविधा उभारण्यावरही शासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित स्वच्छतागृहे, पिण्याचे शुद्ध पाणी, वीजपुरवठा आणि किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन उपलब्ध करून देण्यासाठी नव्याने सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्हा नियोजन समिती व इतर शासकीय निधीचा वापर करून पुढील चार ते सहा महिन्यांत या सर्व सुविधांची उभारणी व आवश्यक बांधकामे पूर्ण केली जातील, असे ठोस आश्वासन राज्यमंत्र्यांनी सभागृहात दिले.शालेय शिक्षण विभागाचा कारभार अधिक पारदर्शक व गतिमान करण्यासाठी डिजिटल कामकाजात काळानुरूप आवश्यक सुधारणा करण्याची ग्वाही शासनाने दिली आहे. वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडीसंदर्भातील कामे ई-ऑफिस प्रणालीद्वारे विहित कार्यपद्धतीने केली जात असून, यात येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी सदस्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतली जाईल. विशेष म्हणजे, शिक्षण विभागाशी संबंधित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)कडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा स्वतः आढावा घेऊन, दोषी आढळणार्‍यांवर कोणतीही गय न करता कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही डॉ. भोयर यांनी दिला.

पेपरफुटी प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी
दरम्यान, राज्याच्या उच्च शिक्षण आणि आदिवासी भागातील प्रश्नांवरही सभागृहात महत्त्वाची चर्चा झाली. मुंबई विद्यापीठाच्या ’टीवायबीकॉम’ पेपरफुटी प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची सूचना विद्यापीठाच्या कुलगुरूंना केली जाणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले. या गैरप्रकरणात आतापर्यंत तीन कर्मचार्‍यांची सेवा समाप्त करण्यात आली असून, दोषी विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करून त्यांना पुढील दोन परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली आहे.

 

Three teachers for every 20 students in rural schools.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू झाले की, घरोघरी…

5 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

10 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

14 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

26 minutes ago

पाथरे खुर्दमध्ये सशस्त्र दरोडा

शेतकर्‍याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…

33 minutes ago

मोहदरी घाटात कंटेनर उलटला; नाशिक-पुणे महामार्ग ठप्प!

समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…

39 minutes ago