गृहमंत्री फडणवीसांचे मुंबई पोलीस आयुक्तांना विशेष पथक स्थापण्याचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांनी उघड केलेल्या 500 कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात आता एसआयटी तपास करणार आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी मुंबई पोलीस आयुक्तांना विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश सोमवारी दिले.
सूत्रांच्या माहितीनुसार, गृहमंत्री या नात्याने फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना तात्काळ एसआयटी स्थापन करून या ऑडिओ क्लिपचा सोर्स, आवाजाची सत्यता, एआय जनरेटेड आहे का, आणि यामागे कोणते राजकीय षडयंत्र आहे का, याचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी यापूर्वीच फडणवीस आणि शिंदे या दोघांनाही ओपन चॅलेंज देत, या क्लिपमागील सत्य शोधण्यात मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.
ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर, सचिन अहिर, मिलिंद देवरा, राहुल शेवाळे, रवींद्र वायकर यांचा समावेश असलेल्या शिंदेसेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी रात्री फडणवीस यांची भेट घेऊन सायबर सेल आणि फॉरेन्सिक तपासाची मागणी केली होती. त्यावर फडणवीस यांनी शुक्रवारी नागपूर पदवीधर मतदारसंघात मतदानानंतर प्रतिक्रिया दिली होती की, शिवसेना आणि भाजप दोघांनीही चौकशीची मागणी केली आहे. जी काही संभाषणे समोर आली आहेत, त्याची पूर्ण फॉरेन्सिक तपासणी केली जाईल. अडीच वर्षांनंतर ही क्लिप आताच का बाहेर आली? यामागचा हेतू काय? कोणाला टार्गेट केले जात आहे? हे सगळे सत्य बाहेर काढले जाईल.
जरांगे यांनी 22 ऑक्टोबर रोजी एक 31 मिनिटांची ऑडिओ क्लिप जारी केली होती. त्यात एका कथित भाजप महिला नेत्याच्या आवाजात दावा करण्यात आला होता की, जरांगे पाटील यांच्यापर्यंत 500 कोटी रुपये पोहोचले आहेत, जे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून पोहोचले आहेत. हा व्हिडिओ 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीचा, शिंदे मुख्यमंत्री असतानाचा असल्याचा दावा आहे. जरांगे यांनी स्वतः पैसे घेतल्याचा आरोप फेटाळला असून, हे आंदोलन संपवण्याचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.
महायुतीत तणाव वाढला
या प्रकरणामुळे महायुतीत उभी फूट पडली आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी थेट आरोप केला की, भाजपमधील काही लोक एकनाथ शिंदे यांना संपवण्यासाठी जरांगे यांच्याशी हातमिळवणी करत आहेत. ऑडिओमध्ये अनेक भाजप नेत्यांची नावे आहेत. तर भाजपचे प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले, मित्रपक्षाने जाहीरपणे असा आरोप करणे दुर्दैवी आहे. ही क्लिप एआयने बनवलेली असू शकते. या एसआयटी चौकशीनंतरच 500 कोटींच्या या बॉम्बचे सत्य काय आहे, हे स्पष्ट होणार आहे.
SIT to investigate the 500-crore audio clip case
प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी 11 जणांविरुद्ध नाशिकरोड पोलिसांत गुन्हा सिडको : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील फुलेनगर परिसरात…
पोतदार शाळेमागील घटना; मोबाइलसह 20 हजारांचा ऐवज चोरीला सिडको : प्रतिनिधी टाकळी रोडवरील पोतदार शाळेच्या…
वाघेरा चौफुलीजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई देवळाली कॅम्प : प्रतिनिधी दमण व दादरा नगरहवेली…
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी मैत्रिणीच्या घरी गेलेल्या महिलेच्या पर्समधून घराची चावी चोरून, त्याच चावीच्या मदतीने…
मुंबई / जालना : प्रतिनिधी कथित पाचशे कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
♦ भरवीर ते इगतपुरी इंटरचेंज 11 दिवस वाहतूक निर्बंध ♦ दिवसातून तीन वेळा एक तास…