नाशिक

प्रभाग रचनेच्या निश्चितीसाठी स्थळ पाहणी

मंगळवारपासून नकाशे तयार केले जाणार

नाशिक : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीच्या द़ृष्टीने प्रशासनाकडून 11 जूनपासून कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे. 17 जूनपर्यंत प्रगणक गटाची मांडणी करण्यात आल्यानंतर प्रारुप प्रभागरचना तयार केली जात आहे. 17 ते 18 जूनदरम्यान जणगणनेची माहिती तपासण्यात आली असून, गुरुवार (दि.19) पासून मनपा आयुक्त प्रमुख असलेल्या मुख्य समितीकडून स्थळ पाहणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारपर्यंत सर्व प्रभागात स्थळ पाहणी सुरू असून, मंगळवार (दि.23) नंतर गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
महापालिकेच्या 31 प्रभागासाठी 2807 प्रगणक गट तयार करण्यात आले आहे. प्रगणक गट मिळूनच प्रभागाची निर्मिती केली जाते. साधारणत: एका प्रभागाच्या निर्मितीसाठी सत्तर ते ऐशी प्रगणक गट असतात. आणि एका प्रगणक गटात पाचशे व त्यापुढे लोकसंख्या असते. शासनाने तीन महिन्यात अंतिम प्रभाग रचना तयार करण्याचे टार्गेट पालिका प्रशासनाला दिले आहे. मनपा आयुक्त मुख्य समितीच्या अध्यक्ष असून प्रारुप प्रभाग रचना त्या निवडणूक आयोगाला सादर करणार आहेत. महापालिका निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर प्रभाग रचनेची कार्यवाही सुरु आहे. 4 सप्टेंबर रोजी अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध केली जाणार आहे. नाशिक महापालिकेसाठी चार सदस्यीय प्रभाग असणार आहे. 2017 साली याच पद्धतीने प्रभाग रचना होती. नाशिकची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 14 लाख 86 हजार 53 एवढी होती. या लोकसंख्येनुसारच महापालिकेची निवडणूक होणार आहे. नगरविकास विभागाने प्रगणक गटाची मांडणी, स्थळ पाहणी, नकाशे तयार करणे अशा विविध बाबींच्या साहाय्याने प्रारूप प्रभाग रचना करण्याचे निर्देश दिले आहेत.
महापालिकेत यापूर्वी निवडणूक कक्ष आहे. निवडणुकीचे काम वाढल्याने प्रशासन विभागाने पाच कर्मचार्‍यांच्या नियुक्ती या कक्षासाठी केली आहे. राज्य शासनाच्या आदेशानंतर महापालिकेचा निवडणूक विभाग कमालीचा कामाला लागला आहे. प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

27 पासून प्रभाग  हद्द तपासणी

गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार केल्यानंतर 27 ते 30 जूनदरम्यान नकाशावर निश्चित केलेल्या प्रभाग हद्दी थेट जागेवर जाऊन तपासल्या जाणार आहेत.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

11 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

11 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

12 hours ago