नाशिक

जि.प.मध्ये 40 उमेदवारांची अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती

नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा परिषद, नाशिक अंतर्गत अनुकंपा तत्त्वावर ज्येष्ठता यादीत प्रतीक्षेत असलेल्या 34 उमेदवारांना गट ड संवर्गात, तर सध्या अनुकंपा तत्वावर कार्यरत असलेल्या गट डमधील पात्र सहा कर्मचार्‍यांना गट क मधील पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
अनुकंपा तत्त्वावर कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांच्या नियुक्तीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि.19) जिल्हा परिषदेच्या कै. रावसाहेब थोरात सभागृहात समुपदेशन प्रक्रिया पार पडली.
राज्य शासनाच्या धोरणानुसार जिल्हा परिषद सेवेत कार्यरत असताना मृत पावलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कायदेशीर वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती दिली जाते. मृत्युपश्चात एक वर्षाच्या आत संबंधित कार्यालयामार्फत प्रस्ताव सादर करून वारसाचा समावेश ज्येष्ठता यादीत केला जातो. उपलब्ध रिक्त पदांपैकी 10 टक्के पदे अनुकंपा तत्त्वावर भरली जातात. शैक्षणिक पात्रतेनुसार गट क मधील पद रिक्त नसेल, तर संबंधित उमेदवाराला गट ड मधील पदावर नियुक्ती दिली जाते आणि त्यानंतर पद उपलब्ध झाल्यास गट क पदावर पदोन्नतीही केली जाते.
नाशिक जिल्हा परिषदेत गट ड संवर्गातील एकूण 48 कर्मचार्‍यांची प्रतीक्षा यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. यातील पात्र 34 उमेदवारांना समुपदेशन पद्धतीने नियुक्ती देण्यात आली.
उर्वरित उमेदवारांना पुढील रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार संधी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गट ड मधील पात्र 6 कर्मचार्‍यांना गट क मध्ये पदोन्नती देण्यात आली आहे.
चार कर्मचार्‍यांना कनिष्ठ सहायक (लेखा), एका कर्मचा-यास वरिष्ठ सहायक (लेखा), तर एका कर्मचा-यास पर्यवेक्षिका म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. या समुपदेशनावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती मुळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संजय शिंदे उपस्थित होते. यासाठी सामान्य प्रशासन विभागातील सहायक प्रशासन अधिकारी अनिल गिते. कनिष्ठ प्रशासन अधिकारी राजेद्र येवला, वरिष्ठ सहाय्यक शीतल शिंदे यांनी परिश्रम घेतले.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

10 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

10 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

11 hours ago