काम रखडवले तर अधिकार्यांना 25 हजारांचा भुर्दंड
मुंबई : प्रतिनिधी
जन्म दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, नावात बदल, जमिनीची नोंद – यासाठी सरकारी कार्यालयात महिने-महिने हेलपाटे मारावे लागतात, हा सर्वसामान्यांचा अनुभव आहे. आता या अनुभवाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. त्यादृष्टीने मंत्रिमंडळाने सुधारणा प्रस्ताव मंजूर केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 मध्ये मोठ्या सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. हा प्रस्ताव आता विधानसभेत विधेयक म्हणून मांडला जाईल, तिथे मंजूर झाला तरच तो कायदा
होईल.
दंड पाचपट वाढणार (5,000 वरून 25,000 पर्यंत)
विनाकारण दिरंगाई करणार्या संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि अपील प्राधिकार्यावरही 25,000 रुपयांपर्यंत दंड लावता येणार आहे. म्हणजे तुमचे अपीलही जाणूनबुजून रखडवले तर अपील अधिकारीही दंडाला पात्र ठरेल.
आयुक्तांना थेट अधिकार
मुख्य आयुक्त आणि आयुक्त यांना स्वतःहून चौकशी आणि दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार मिळणार आहेत. त्यांना अभिलेख आणि माहिती मागवता येईल आणि आयोगाच्या आदेशांचं पुनर्विलोकनही करता येईल.
आता काय बदलणार?
हा कायदा 28 एप्रिल 2015 पासून लागू आहे. त्यात आतापर्यंत 1,200 हून अधिक सेवा अधिसूचित आहेत. म्हणजे प्रत्येक सेवेसाठी किती दिवसांत ती मिळायला हवी, कोणता अधिकारी देणार, हे ठरलेले आहे. पण या कायद्यातील सर्वांत मोठी कमजोरी म्हणजे वेळेत सेवा न दिली तर कारवाईची ठोस तरतूदच नव्हती. त्यामुळे लोकसेवा हक्क आयुक्तांनाही दोषी अधिकार्यावर कारवाई करता येत नव्हती. सध्याच्या कायद्यात दंडाची मर्यादा फक्त 5,000 रुपये होती, तीही प्रत्यक्षात फारशी लावली जात नव्हती.
‘Government work means a six-month wait’ — this is now a thing of the past.
नाशिक : देवयानी सोनार मृत्यू हा अटळ असला तरी अवयवदानाच्या रूपाने इतरांच्या जीवनात आशेचा किरण…
पन्नास मुख्य चौकांत उपाययोजना ♦ चौक सुधारणा आराखड्यास मंजुरी ♦ अठरा कोटींचा खर्च नाशिक :…
न्यायालय परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ सिडको : प्रतिनिधी पुणे न्यायालयाला धमकी मिळाल्याच्या घटनेनंतर आता नाशिक…
एक जण गंभीर जखमी, संशयित फरार निफाड : तालुका प्रतिनिधी राज्यात गोळीबाराच्या घटनांमुळे कायदा व…
राज्य सरकारकडून ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’चा मसुदा जाहीर मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात फ्लॅट घेणार्यांसाठी आतापर्यंतची सर्वांत…
30 नोव्हेंबरला लोकसभा, 2 डिसेंबरला राज्यसभेचे सत्र नवी दिल्ली : प्रतिनिधी संसदेचे संस्थगित न झालेले…