राजकारणातील धगधगते वादळ ‘अजितदादा’ काळाच्या पडद्याआड
बारामती :
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील बुधवारचा दिवस एका काळ्या अध्यायाप्रमाणे उजाडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झालेे. ’दादा’ म्हणून ओळखल्या जाणार्या अजित पवारांच्या निधनामुळे राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, राज्य सरकारने सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. प्रशासनाकडून या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, संपूर्ण महाराष्ट्र सध्या सुन्न अवस्थेत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगते पर्व कायमचे शांत झाले आहे. 22 जुलै 1959 रोजी जन्मलेले अजित पवार केवळ एक नेते नव्हते, तर ते गतिमान प्रशासनाचे प्रतीक होते. 1982 मध्ये स्थानिक राजकारणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या विक्रमी सहा वेळाच्या कारकिर्दीपर्यंत पोहोचला. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक असा नेता गमावला आहे, ज्याचा प्रशासनावर प्रचंड वचक आणि शब्दाला मोठी किंमत होती. 1982 मध्ये सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावरून त्यांनी सक्रिय राजकारणात पाऊल ठेवले. 1991 मध्ये ते पहिल्यांदा बारामतीतून खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी सलग आठ वेळा विधानसभेत बारामतीचे प्रतिनिधित्व केले. जलसंपदा, अर्थ आणि नियोजन यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळताना त्यांनी आपल्या कामाची वेगळी छाप पाडली. कामात स्पष्टवक्तेपणा आणि वेळेचे पालन ही त्यांची प्रमुख ओळख होती. महाराष्ट्राच्या इतिहासात सहा वेळा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा ऐतिहासिक विक्रम त्यांच्या नावावर आहे. पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा विविध मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी हे पद भूषवले. काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यात अजित पवारांचा मोलाचा वाटा होता.
1993 साली जेव्हा शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारले, तेव्हा अजित पवार यांच्याकडे मंत्रिमंडळातील महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. या संधीचे सोने करत त्यांनी प्रशासनावर आपली पकड निर्माण केली. 2010 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर त्यांचा राजकीय लौकिक अधिक उंचावला. या काळात राज्याच्या धोरणात्मक निर्णयात त्यांचा शब्द प्रमाण मानला जात असे. अजित पवार यांची ओळख केवळ एक राजकारणी म्हणून मर्यादित नव्हती. महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत त्यांनी मोलाचे योगदान दिले. राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांच्या जडणघडणीत आणि व्यवस्थापनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहताना त्यांनी शेतकरी आणि सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. सहकार क्षेत्रातील शिस्त आणि पारदर्शकता ही त्यांच्या कामाची मुख्य वैशिष्ट्ये राहिली. राजकारण असो वा सहकार, अजित पवार यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या स्पष्टवक्तेपणाची आणि कामाच्या झपाट्याची छाप पाडली. त्यांच्या जाण्याने सहकार चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
जुलै 2023 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आणि सत्तेच्या केंद्रस्थानी राहून प्रशासनावर आपली पकड किती मजबूत आहे, हे पुन्हा एकदा दाखवून दिले होते. राज्याच्या राजकारणात जुलै 2023 मध्ये झालेल्या मोठ्या उलथापालथीनंतर त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या भूमिकेत त्यांनी राज्याच्या विकासकामांना गती देण्याचे काम केले. मंत्रालयातील फाइल्सचा निपटारा असो किंवा जिल्हा पातळीवरील आढावा बैठका, अजित पवारांच्या कामाची पद्धत नेहमीच ’रिझल्ट ओरिएंटेड’ राहिली.
Six times Deputy Chief Minister and 40 years of Dhara
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…